जळगाव : आमच्या गावाच्या विकासाच्या दिशा काय ? आम्हाला समृद्धी महामार्ग नको आहे ? आमच्याकडे एसटी येते तिला चांगले रस्ते पाहिजे. आमच्याकडे मागे एसटीचे आंदोलन झाले होते, त्याकरिता दोन चार लोकं पेटूनही दिले होते. सदभाऊ खोत आझाद मैदानावर झोपले होते, ते किती डास चाउतुया असं म्हंटले होते ना ? मध्येच एक वकील सोडला होता मोठ्या चष्म्यावाला. महाविकास आघाडी सरकार चांगले सुरू होते. पण दोघेही पती-पत्नी कसे बोलत होते. नंतर मोहित कंबोज नावाचा भोंगा सोडला होता. आता कुठं गेला तो. पण आता सरकार बदललं तर जिथे-जिथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या ग्रामपंचायत आहे तिथे-तिथे अपात्र कारवाई सुरू केली आहे. गिरीश महाजन यांनी तर ही कारवाई सुरू केली त्याचा फटका मलाही बसला, असं जळगाव येथील भाषणादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हंटलं आहे. अमोल मिटकरी यांनी यावेळी सदाभाऊ खोत यांनी मिमीक्री केलीय. एसटी आंदोलनावरुण गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे.
जळगाव येथील विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचाराच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी प्रचार सभा घेतल्या आहेत, एकनाथ खडसे यांच्या मतदार संघात मिटकरी यांनी तूफान फटकेबाजी केली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे यांच्यासमोरच गिरीश महाजन यांच्यावर टीका केली, त्यात स्वतःवरच कसा अन्याय झाला याचे उदाहरण दिले आहे.
जळगाव झटका मला तिकडे दिले, माझे 13 सदस्य अपात्र केले, भाजपच्या एका माणसाला हाताशी धरून माझ्यावर तिकडे अन्याय केला.
शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा म्हणून आधी ओरडत होते, आता तुमचं सरकार आहे मग करा ना वीजबिल माफ असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
मात्र, याच भाषणादरम्यान अमोल मिटकरी यांनी केलेल्या भाषणात सदाभाऊ खोत, मोहित कंबोज आणि गुणरत्न सदावर्ते यांची घेतलेली फिरकी चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.