अमरावती : अपघातानंतर बाईकने पेट घेतल्याने दोघा दुचाकीस्वार युवकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावतीत समोर आली आहे. अपघातात 15 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना 18 वर्षीय तरुणाने रस्त्यात प्राण सोडले. अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा भागात हा अपघात घडला. (Amravati Bike Accident Fire kills two riders)
निवृत्ती दीपक सोलव (15) आणि राज अनंत वैद्य (18, दोघेही रा. तळणी पूर्णा) अशी भाजून मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. अमरावती-परतवाडा मार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले.
निवृत्ती सोलव आणि राज वैद्य हे अचलपूर तालुक्यातील तळणीपूर्णा येथून बाईकने आसेगावकडे जात होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाची त्यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातानंतर पिकअप वाहनाच्या समोरच्या चाकात आलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला.
अपघातात निवृत्ती सोलव याचा भाजून घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राज वैद्य याला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्याने अखेरचा श्वास घेतला. एकाचा मृतदेह जळून खाक झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी पहायला मिळाली.
पिंपरी चिंचवडमध्ये दोन मित्रांमध्ये पैशांच्या देवाणघेवणीवरुन वाद झाला होता. याचा सूड घेण्यासाठी एका मित्राने दुसऱ्याची गाडी पेटवली. या घटनेत भडका उडाला आणि आगीने रौद्ररुप धारण केले. जाळपोळीच्या घटनेत जानेवारीच्या सुरुवातीला एकूण दहा वाहनं जळून खाक झाली होती.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत 31 डिसेंबरला बुलेटचा भीषण अपघात झाला होता. विरार हद्दीत खाणीवडे ब्रिजवर भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेट चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बुलेट स्लिप होऊन महामार्गावर पडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला होता.
संबंधित बातम्या :
सुपर बाईकची धूम ठरली अखेरची, राईड दरम्यान अपघात होऊन तरुणाचा दुर्दैवी अंत
भांडणाच्या सूडापोटी मित्राची दुचाकी पेटवली, चिंचवडमध्ये दहा गाड्या जळून खाक
(Amravati Bike Accident Fire kills two riders)