गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

| Updated on: Aug 25, 2024 | 10:44 AM

गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू
Follow us on

Amravati Nagpur Highway Accident : अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत. गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा अपघात झाल्याचे बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती-नागपूर महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एका शिवशाही बसला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होती की बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यात 25 ते 30 प्रवाशी प्रवास करत होते.

एकाचा मृत्यू, 28 प्रवासी जखमी

ही बस नागपूरहून अकोल्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी अमरावती-नागपूर महामार्गावर क्रमांक 6 वर एक गाय या बसच्या मध्ये आली. यावेळी बस चालकाने गाईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

या अपघातामुळे अमरावती-नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बसच्या चालकाने सांगितला घटनाक्रम

मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. मी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण माझी गाडी पलटी झाली. माझ्या बसमध्ये एकूण 35 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातील 28 जण जखमी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया या अपघातग्रस्त झालेल्या शिवशाही बसच्या चालकाने दिली.