अमरावती : युवा नेते आदित्य ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. ओला दुष्काळ जाहीर होत नाही. दुसऱ्या बाजूला मला नावं ठेवता. ठीक आहे मला नावं ठेवा. पण, महिलेवर असा शब्दप्रयोग करणं हे अतिशय गलिच्छ प्रकार सुरू आहेत. 40 गद्दारांनी महाराष्ट्राचे राजकारण घाणेरडं केले आहे. हे सर्व एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांशेनं झालंय. गुलाबराव पाटील हे सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलले. अतिशय घाणेरडे वक्तव्य केलंय. आज दुसरे गद्दारही तसंच बोलले आहेत.
मुंबईत दुसरी टीम फिरते आहे. प्रकाश सुर्वेची टीम सुपारी देत आहे. एका आमदारानं दोघांना सुपारी दिली. या राज्यात काय सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा वचप राहिलेला नाही. कायदा, सुव्यवस्थेच्या चिंधळ्या उडत आहेत. कायदा, सुव्यवस्था मार्गावर आणावं असं राज्य सरकारला वाटत नाही. सत्तार यांचा राजीनामा घेतला नाही, तर भाजप महिला सुरक्षेवर किती सिरीयस आहे, हे दिसून येईल, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.
संस्कार झाले असतात. त्यातून चुकीनं शिवी देऊन जातो. माफी मागावी नि विधान मागे घ्यावं. पण, ठाम राहताना सत्तेचा माज आला, असं वाटतं. महिला सुरक्षित आहेत का. हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. राजकारणाची पातळी ही खाली गेलीत. मला वाटतं की, भाजपनं उत्तर देणं अपेक्षित आहे. गद्दारांसोबत राहणार की, काही कारवाई होणार, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
महिला आयोग या गद्दारांना नोटीस पाठविणार की, नाही. हे सर्व राजकीय कारणासाठी असते. आता यातून हे स्पष्ट होईल.
बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे आहेत. ते म्हणाले, खरं तर हे कृषिमंत्र्यांनी असे दौरे करायला पाहिजे. आम्हाला नावं देण्यापेक्षा त्यांनी बघावं.