अमरावती : काँग्रेसचे हरिभाऊ मोहोड यांनी अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्या विरोधात मंगळवारी दुपारी तक्रार नोंदविली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांची व शासनाची बदनामी केली. त्याचबरोबर समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने डॉ. बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावा. त्यांना अटक करावी अशी तक्रार मोहोड यांनी केली होती. याप्रकरणी भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांच्याविरुद्ध अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसात (Amravati Police) गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर अचलपूर दंगलीच्या मास्टरमाइंड असल्याचा आरोप बोंडेंनी केला होता. काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांच्या तक्रारी वरून अनिल बोंडे यांच्यावर 502 (2)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर दंगली मागे हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अमरावतीत युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. मानसिक रुग्णालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. अनिल बोंडेंच्या फोटोला युवक काँग्रेसने दुग्धभिषेक घातला. डॉ. अनिल बोंडे यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांना जबाबदार धरत अचलपूर घटनेच्या त्या मास्टरमाइंड असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याला प्रतिउत्तर म्हणून तिवसा तालुक्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोझरी येथील प्राचीन शिवमंदिरात जाऊन आरती केली. तसेच अनिल बोंडे यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करत अनिल बोंडे यांना सद्सद् विवेक बुद्धी मिळावी. त्यांचे मानसिक संतुलन सुधारावे, असे साकडे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घातले.
अमरावती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे वैफलग्रस्त अवस्थेत असल्याचं म्हटलं. अनिल बोंडेचा अमरावतीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पोलीस तपास करत आहेत. बोंडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असंही ठाकूर म्हणाल्या होत्या. अमरावतीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. अमरावतीचं वातावरण खराब करण्याचं काम केल गेलंय. सल्लोख्याचं वातावरण बिघडवण्याचा राजकीय प्रयत्न केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर आज अनिल बोंडे यांच्या विरोधात गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.