अमरावती : ताईंनी म्हंटलं की, दादांनी खूप पैसे दिले. पण, दादा तुमचा थोडा वेळ चुकला. सकाळच्या जागी दुपार झाला असता. तर दादा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. हा गमतीचा भाग आहे. अंगावर घेऊ नका. रागाऊ नका, असंही प्रवीण पोटे लगेच म्हणाले. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या अहिल्यादेवी शक्ती पुरस्कार सोहळ्याचं आयोजन अमरावतीत करण्यात आलं.यावेळी प्रवीण पोटे बोलत होते. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, सुरेखाताई ठाकरे उपस्थित होते.
यावेळी कर्तृत्वावान महिलांचा सत्कार करण्यात आला. साधना सरगम, सरिता कौशिक, श्रद्धा धवड, अक्षता ढेकणे,प्रीती देशमुख, महावर्ती थूल यांचा सत्कार करण्यात आला.
अजित पवार असलेल्या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. आज योगायोग फार सुंदर आहे. कर्तृत्ववान स्त्रीयांचा सत्कार करतो. तसा पुरुषांमध्ये मी अजित दादा पवार यांचा सत्कार घेतल्याशिवाय राहणार नाही, असंही प्रवीण पोटे म्हणाले.
आपआपल्या ठिकाणी नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या महिला याठिकाणी आल्यात. अमरावती जिल्ह्याच्या महिलांना त्यांनी प्रोत्साहित केलं.
प्रीती देशमुख यांचे पती सचिन चौधरी हे कामामध्ये फारच परफेक्ट होते. कोणती लाईन कुठं आहे. हे त्यांना कळायचं. सचिन चौधरी आपल्यातून निघून गेले. ही घटना दुर्दैवी आहे. एखादी लाईन कशी बसवायची ते सचिन चौधरी सांगत होते. याची आठवण प्रवीण पोटे यांनी करून दिली.