मेळघाटातील बालमृत्यू आता रुग्णालयातही; या कारणांनी दगावले इतके चिमुकले

| Updated on: Apr 01, 2023 | 10:21 AM

सगळेचं बालक उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. अशावेळी त्यांचा मृत्यू होऊ शकतो. पाच व्हेंटिलेटर आपल्याकडे उपलब्ध आहेत. शिवाय काही व्हेंटिलेटरची मागणी केली आहे.

मेळघाटातील बालमृत्यू आता रुग्णालयातही; या कारणांनी दगावले इतके चिमुकले
Follow us on

अमरावती : महिला लोकप्रतिनिधीचा जिल्हा म्हणून अमरावती जिल्ह्यातील राज्यभरात एक वेगळी ओळख आहे. पण याच जिल्ह्यातील मेळघाटमध्ये मातामृत्यू कुपोषित बालकांचे मृत्यू होत असल्याचा घटना नेहमीच घडत असतात. हे ताजे असतानाच आता चिमुकल्या बालमृत्यू लोण हे अमरावती शहरातील जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात पोहचलं. अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची प्रसूती करणाऱ्या या रुग्णालयात मागील एक वर्षात शेकडो चिमुकले विविध कारणांनी दगावले. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

176 बालकांचा मृत्यू

महिला लोकप्रतिनिधींचा जिल्हा असलेल्या अमरावतीमधील रुग्णालयातील भीषण वास्तवाने आरोग्य यंत्रणा गंभीर नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या रुग्णालयात जन्म झालेल्या बालकापैकी मृत्यू झालेल्या 176 बालकांचा मृत्यू हा विविध कारणांनी झाला. अशी सारवासारव डॉक्टर करत आहेत.

हे सुद्धा वाचा

या बालमृत्यूला व्हेंटिलेटरची कमतरता काही अंशी कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. बालकांना तात्काळ उपचारासाठी आणि ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी चार व्हेंटिलेटरची मागणी केली. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी दिली.

या कारणांनी होतो बालमृत्यू

डॉ. विनोद पवार म्हणाले, जन्मजात व्यंग असतो. ह्रदयविकास, शल्य विकृती यामुळे सुद्धा बालकांचा मृत्यू होऊ शकतो. काही बालकांना अनुवंशिक आजार असतात. एक किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ असल्यास त्यांना जगवणे हे आव्हानात्मक असते.

अतिकमी दिवसाचे बाळ झाल्यास किंवा काही बालकांना संसर्ग असतो. श्वास घेण्यास त्रास होणे, न्यूमोनिया या कारणांनीही काही बाळांचा मृत्यू होतो. आईच्या पोटात असताना शी केल्यास बाळांना श्वास घेण्यास त्रास होऊन त्यांचा मृत्यू होतो.

व्हेंटिलेटरची केली मागणी

सगळेचं बालक उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. अशावेळी त्यांचा मृत्यू होऊ शकतो. पाच व्हेंटिलेटर आपल्याकडे उपलब्ध आहेत. शिवाय काही व्हेंटिलेटरची मागणी केली आहे. गरज पडल्यास सुपर स्पेशालिटीत पाठवले जाते. तिथंही व्हेंटिलेटर्स आहेत, असं स्पष्टीकरण डॉ. विनोद पवार यांनी दिलं. त्यामुळे आतातरी बालमृत्यूचे प्रमाण कमी होते का, हे पाहावं लागेल.