राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज अमरावतीमध्ये आहेत. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तब्बल सहा महिन्यानंतर जिल्हा नियोजन विभागाची बैठक घेतली. सहा महिन्यानंतर बैठक झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीच्या अचलपूरमधील फिनले मिलवरून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात खडाजंगी झाली.
अमरावती जिल्हा नियोजन बैठकित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हा वाद झाला. फिनले मिल वरून दोन आमदारामध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात आंदोलन सुरू आहे. पण एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्थिक मागास विकास मंडळ मध्ये एकतीस जाती होत्या. आर्थिक मागासवर्गीयांचं आरक्षण जर मराठा समाजाला असते तरुण नोकरीवर लागले असते. आर्थिक मागासमधून 10 टक्के आरक्षणावर मनोज जरांगे यांनी विचार केला पाहिजे. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा उभा संघर्ष महाराष्ट्र मध्ये निर्माण झाला आहे. तो समाजाला भिडवून बिघडवणारा ठरेल. मनोज जरांगे पाटलांनी इच्छा व्यक्त केली तर त्यांनी चार वकील उपस्थित ठेवावेत. मी कोणाला उपस्थित न ठेवताना एकटा बाजू मांडेल. मला काही वकील नको, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं… ते नीट बोलले नाहीत. तर समोरच्याला अवगत नाही. समोरचा कार्यकर्ता असतो चाहता होतो तो टाळ्या वाजते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये संस्कृतीपणा संपत चालला आहे सगळ्यांनी बसून विचार केला पाहिजे. कधीही उद्धव ठाकरेंच भाषण काढा दांडा, मारेल, तोडेल टरबूजा हेच बोलणं असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्या नेत्यांना अमित भाईंना हे बोलले सामान्य कार्यकर्त्यांना आवडत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
संजय राऊत हे माध्यमांशी बोलताना महायुतीवर टीका करतात. त्यावर सुरुवातीच्या काळामध्ये संजय राऊत एक ग्लॅमर होतं. आता संजय राऊत यांना कोणी सिरअस घेत नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.