Video : खोट्या कॉलमुळे खळबळ! दंगलीच्या विषयावरुन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्याला अटक

| Updated on: May 03, 2022 | 9:06 AM

Amravati News : हा फोन करणाऱ्याचा शोध घेत पोलिसांनी या युवकाला ताब्यातही घेतलं. नागपूरीं गेट इथून पोलिसांनी या युवकाच्या मुसक्या आवळल्यात.

Video : खोट्या कॉलमुळे खळबळ! दंगलीच्या विषयावरुन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्याला अटक
अफवांवर विश्वास ठेवू नका
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अमरावती : अमरावतीमध्ये (Amravati News) एका फोनमुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. काही जण दंगल घडवण्याच्या तयारीत असल्याचा फोन पोलिसाना आला. मात्र हा फोन कॉल बोगस असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरी पोलिसांनी बनावट फोन कॉल (Fake call) करुन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्याल ताब्यातही घेण्यात आलंय. पोलिसांच्या आपत्कालीन क्रमाकांवर एका युवकानं फोन करुन अफवा पसरवली होती. 112 क्रमाकांवर फोन करुन दंगली प्रयत्न सुरु असल्याचं या युवकानं फोनवरुन सांगितल्यामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. मात्र हा फोनकॉल खोटा असल्याचं समोर आलंय. त्यामुळे पोलिसांनी लोकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलंय. सोशल मीडियावरही (Social Media) कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असंदेखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. अमरावतीत सोशल मीजियावरही अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आहे. दरम्यान, बोगस फोन कॉलनंतर आता अमरावतीमधील पोलीस यंत्रणा अधिकत सतर्क झाली आहे. ईद आणि अक्षय तृतीया असल्यामुळे अमरावतीसह संपूर्ण राज्यात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी बाळगण्यात येते आहे.

खोट्या फोनमुळे खळबळ

पोलिसांच्या 112 या आपत्काळीन क्रमांकावर खोटा फोन कॉल आला होता. या फोन कॉलद्वारे एका युवकानं काही लोकं दंगल घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला होता. 400 ते 500 लोकं हातात हत्यारं घेऊन दंगल घडवण्याच्या तयारीत असल्याचा खोटा फोन एका युवकानं केलेला.

दरम्यान, हा फोन करणाऱ्याचा शोध घेत पोलिसांनी या युवकाला ताब्यातही घेतलं. नागपूरीं गेट इथून पोलिसांनी या युवकाच्या मुसक्या आवळल्यात. काही काळ पोलीस दलात या खोड्या फोन कॉलमुळे खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा

अचलपूरसारखा प्रकार पुन्हा नको…

काही दिवासांपूर्वीच अमरावतीच्या अचलपूमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली होती. एका झेंड्यावरुन झालेल्या वादाचं रुपांतर तुफानी राड्यात झालेलं. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. एका समुहाच्या लोकं झेंडा गाडण्यासाठी गेले असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याला दुसऱ्या गटानं विरोध केल्यानं वाद पेटला होता. दगडफेकही झाली होती. अमरावतीमधील अचलपूर शहरातील दुल्हा गेटसमोर विटांचे तुकडे आढळून आले होते. त्यानंतर काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं. दरम्यान, यानंतर या भागात संचारबंदीही लावण्यात आली होती. आणि पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली होती.

पाहा व्हिडीओ :