Video : Navneet Rana | अमरावती : शाई फेक प्रकरण, रवी राणांवर गुन्हा का दाखल केला?, नवनीत राणा कडाडल्या; आयुक्तांनी भेट नाकारली

| Updated on: Feb 12, 2022 | 3:37 PM

नवनीत राणा यांनी आरोप केला की, पालकमंत्र्यांच्या दबावामुळे आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतत पालकमंत्र्यांचे फोन सुरू असल्याने आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : Navneet Rana | अमरावती : शाई फेक प्रकरण, रवी राणांवर गुन्हा का दाखल केला?, नवनीत राणा कडाडल्या; आयुक्तांनी भेट नाकारली
मनपा आयुक्तांना भेटावयास गेलेल्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी गेटजवळच थांबविले.
Follow us on

अमरावती : शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अमरावतीमध्ये मनपा आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाई फेक प्रकरण चांगलंच गाजतेय. या प्रकरणी अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यावर देखील केस दाखल करण्यात आली होती. त्या संदर्भात आज नवनीत राणा पोलीस आयुक्त यांच्याशी भेट घेणार होत्या. मात्र पोलीस आयुक्त आरती सिंग (Commissioner of Police Aarti Singh) यांनी भेट नाकारली. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) नसतानादेखील त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याचे उत्तर द्यावे, असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केलाय. त्या म्हणाल्या, सत्ता तुमची आहे. तुम्हाला जर आम्हाला अटक करायची असेल तर करा. आम्ही पोलीस ठाण्यामध्ये जायला तयार आहोत. नवनीत राणा यांनी आरोप केला की, पालकमंत्र्यांच्या (Guardian Minister pressure) दबावामुळे आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतत पालकमंत्र्यांचे फोन सुरू असल्याने आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुक्तांनी भेट नाकारल्याने राणा परतल्या

महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी नवनीत राणा यांची भेट नाकारली. पोलिसांवर मुंबईवरून अमरावतीत दबाव देण्यात आला. म्हणूनच पोलिसांनी आमदार रवी राणा गुन्हा दाखल केला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना फसवा असे पन्नास फोन अमरावतीच्या पालकमंत्र्यांनी पोलिसांना केले. खासदार नवनीत राणा या मनपा आयुक्त यांच्या घरासमोर गेल्या. मनपा आयुक्त यांच्या घराचे गेट बंद होते. गेट जवळील सिक्युरिटी गार्ड त्यांना आतमध्ये जाऊ देण्यास मज्जाव केला. मी आयुक्तांचे सांत्वन करण्यासाठी आली होती. पण, मला न भेटून त्यांना मी प्रतिनिधीत्व करीत असलेल्या लोकांचा अपमान केला, असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.

राजापेठ पोलिसांकडून घेतली माहिती

महानगरपालिका आयुक्त यांच्या घराचे गेट बंद होते. गेटजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. नवनीत राणा या पोलिसांकडून शाईफेकीची माहिती घेतली. मनपा आयुक्तांनी भेट नाकारल्यानंतर राणा या थेट राजापेठ पोलीस ठाण्यात पोहचल्या.

खोटे गुन्हे दाखल, केंद्राकडे तक्रार करणार – नवनीत राणा

राजापेठ उड्डाणपुलावरील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाही फेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्या सह 11 कार्यकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मुख्यमंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या दबावात रात्री उशिरा दाखल करण्यात आल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. मनपा आयुक्तांनी खोटी तक्रार देऊन पोलीस आयुक्तांनी देखील त्या तक्रारीची शहनिशा न करता हत्येचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल केले. आपण मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त या दोघांचीही केंद्राकडे तक्रार करून चौकशी लावणार असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली.

Nagpur Z p | नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता गुणवत्ता चाचणी, गुरुजी कसे जाणार सामोरे?

गोंदिया जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी सहा उमेदवारी अर्ज, नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?

Video – नागपूर सीमेलगतच्या गावात शिरले अस्वल; रात्रीच्या अंधारात शिकारीचा बेत?, वनविभागाची शोधमोहीम