Amravati | अमरावती महापालिका प्रभाग रचना, 300 पेक्षा जास्त हरकती, दोन मार्चला अंतिम प्रभाग रचना

| Updated on: Feb 15, 2022 | 4:47 PM

प्रभाग रचनेमुळं काही नगरसेवकांचे प्रभाग दुसरीकडं गेला आहे. शिवाय नवीन प्रभाग संबंधित प्रभागात जोडल्या गेला आहे. त्यामुळं नवीन मतदारांना आपलंस करण्याचं आवाहन त्यांच्यापुढं राहणार आहे.

Amravati | अमरावती महापालिका प्रभाग रचना, 300 पेक्षा जास्त हरकती, दोन मार्चला अंतिम प्रभाग रचना
अमरावती महानगरपालिका.
Follow us on

अमरावती : महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवसापर्यंत पाचही झोन व मुख्यालयात 300 पेक्षा जास्त हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये काल शेवटच्या दिवशी 250 हरकती आल्यात. अमरावती महापालिकेच्या (Amravati Municipal Corporation) प्रभागामध्ये यंदा वाढ झाली. 33 प्रभाग व सदस्य संख्येत वाढ होऊन 98 झाले आहेत. या शिवाय चार ऐवजी तीन सदस्यांचे 32 व एक दोन सदस्य राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात किमान पाच हजार लोकसंख्या कमी झाली. भौगोलीक रचना बदललेली आहे. हरकतीवर सुनावणी (Hearing) झाल्यानंतर 2 मार्च रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. प्रभाग रचनेमुळं काही नगरसेवकांचे प्रभाग दुसरीकडं गेला आहे. शिवाय नवीन प्रभाग संबंधित प्रभागात जोडल्या गेला आहे. त्यामुळं नवीन मतदारांना आपलंस करण्याचं आवाहन त्यांच्यापुढं राहणार आहे.

असे आहे प्रभाग रचनेचे प्रारुप

अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप नुकतेच जाहीर करण्यात आले. 2011 च्या जनगणनेनुसार हे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्यामुळं नगरसेवकांची सदस्यसंख्या 87 वरून 98 वर पोहोचली. प्रभागांची संख्या मात्र 23 वरून 33 वर झाली आहे. बडनेरा उपनगरातील आठवडी बाजार हा सर्वांत कमी लोकसंख्येचा प्रभाग राहणार आहे. मनपाचा 32 प्रभाग तीन सदस्यांसाठी तर एक प्रभाग दोन सदस्यांसाठी राहणार आहे. 17 जागा अनुसूचित जातीसाठी, 2 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहेत. महिलांसाठी आरक्षित जागा 49 राहणार आहेत. अमरावती शहराची एकूण लोकसंख्या 6 लाख 47 हजार 57 आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीचे 1 लाख 11 हजार 435, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 15 हजार 955 आहे.

32 प्रभागांचे तीन सदस्यांचे

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश धडकल्यानंतर महापालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आठ मार्चला महापालिकेची मुदत संपत आहे. त्यापूर्वी दोन मार्चला अंतिम प्रभाग रचना होणार आहे. निवडणुका किमान महिनाभर लांबणीवर पडणार व प्रशासकराज राहणार हे पाहावे लागेल. बहुसदस्यीय प्रभाग रचनेमध्ये 32 प्रभाग तीन सदस्यांचे राहतील. एक दोन सदस्यांचा प्रभाग राहणार आहे.

Melghat Fire | जंगल मे फायर नही, फ्लावर होणे चाहिये!, समाजमाध्यमांवरील पोस्टरने वेधले लक्ष; दंड काय होणार माहीत आहे का?

Valentine’s Day | अमरावतीत अनोखा उपक्रम, व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला जोडप्यांनी केले रक्तदान; यामागचे कारण काय?

Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणुकीची पूर्वतयारी, प्रभागाच्या प्रारुपावर 122 आक्षेप, सुनावणीसाठी नागरिकांना बोलावणार?