माझं राजकारण जनतेसाठी आहे. स्वतःचं घर भरण्यासाठी नाही…. स्वतः ची मालमत्ता वाढवण्यासाठी काहीजण राजकारण करत आहेत. माझा बाप काढतात. माझ्या वडिलांनी सिमेवर कर्तव्य बजावले. 33 महिन्याचे सरकारने होते. तेव्हा हनुमान चालीसा म्हटली, म्हणून मला 14 दिवस जेलमध्ये टाकलं. हे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना शोभलं का? माझ्यासारख्या लहान व्यक्तीला जेलमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही. 5 वेळा ज्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यांनी उमेदवार उभा केला नाही, असं म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
अमरावतीमधून नवनीत राणा पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. भाजपच्या तिकीटावर त्या निवडणूक लढवत आहेत. महायुतीच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी अमरावतीत जाहीर सभा होत आहे. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच युतीचे इतरही नेते उपस्थित आहेत. या सभेत बोलताना नवनीत राणा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हनुमान चालिसा पठण प्रकरणावरून झालेल्या कारवाईवरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.
महायुतीच्या सभेत बोलताना नवनीत राणा यांचे पती, आमदार रवी राणा यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला. तसंच नवनीत राणा याच निवडणूक जिंकतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पण निवडणुकीआधीच सांगतो की, आजची ही रॅली विजयी रॅली आहे… ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना सांगतो, यंदा अमरावतीत कमळ फुलणार आहे. नवनीत राणा या विजयी होणारच आहेत, असं म्हणत रवी राणा यांनी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना टोला लगावला आहे.
एक आमचा खूप चांगला मित्र आहे. तो मैत्रीपूर्ण वागून सर्वांचा उपयोग घेतो. तो मित्र रवी राणाचा बाप काढत आहेत. नवनीत राणांचा बाप काढत आहे. रवी राणाचा बाप हमाल होता. नवनीत राणांचा बाप देशाची सेवा करत होता. जेव्हा एखाद्याचं लग्न असतं. तेव्हा त्यांच्या परिवाराने शांत राहायचं असतं. म्हणून मी शांत आहे. रवी राणा नेहमी गोरगरिबांसमोर झुकलेला असतो, असं म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडु यांचं नाव न घेता टीका केली आहे.