अमरावती : युक्रेनमध्ये (Ukraine) एमबीबीएसच्या (mbbs) शिक्षणासाठी गेलेला अमरावती जिल्ह्याचा साहिर तेलंग (Sahir Telang) हा विद्यार्थी चांदूररेल्वे येथे त्याच्या घरी सुखरूप परतला आहे. घरी येताच त्याचे चांदूररेल्वे येथील प्रतिष्ठित नागरिकांनी घरी जाऊन स्वागत केले. युक्रेनविरोधात रशियाने युद्ध सुरू केले आहे. आज या युद्धाचा पाचवा दिवस आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक युद्ध सुरू झाल्याने व युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व विमान उड्डाने बंद असल्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यापैकीच एक साहिर तेलंग हा विद्यार्थी होता. मात्र तो आता त्याच्या चांदूररेल्वे येथील घरी सुखरूप पोहोचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. साहिर कधी घरी परतणार याकडे त्याच्या कुटुंबीयांचे डोळे लागले होते. मात्र आता तो सुखरुपपणे घरी पोहोचला आहे. घरी पोहोचल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
माझा मुलगा घरी आल्याने मला समाधान वाटत आहे. माझ मुलगा सुखरूप घरी परतला. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर तो तिकडे अडकला होता. प्रसारमाध्यमातून युद्धाच्या बातम्या कानावर पडत असल्याने आमची चिंता वाढली होती. आम्ही तो कधी परत येतो याची वाट बघत होतो. अखेर तो दिवस उजाडला, माझा मुलगा घरी आला आहे. माझा मुलगा जरी घरी अला असला तरी देखील अजूनही भारतामधील हजारो विद्यार्थी कीव व खार्गिव सारख्या शहरांमध्ये अडकले आहेत. त्यांची देखील काळजी वाटते, सरकारने या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर घरी आणावे अशी प्रतिक्रिया शाहीर यांचे वडील प्रसेनजीत तेलंग यांनी दिली आहे.
दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबवण्यात आली आहे. आतापर्यंत युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी भारतात आणण्यासाठी विमानाच्या पाच फेऱ्या करण्यात आला आहे. आज सकाळीच जवळपास 250 विद्यार्थ्यांना घेऊन पाचवे विमान दिल्लीत दाखल झाले. या मुलांनी सरकारचे आभार मानले आहेत.
जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पुतीनविरोधात लाखो लोक उतरले रस्त्यावर
बेलारूसची रशियाला मदत; रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार? युक्रेनचे टेन्शन वाढले