विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. या निवडणुकीसाठी सगळ्याचं पक्षांनी तयारी सुरु केली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आणण्यासाठी रणनिती आखली जात आहे. जागावाटप आणि स्थानिक राजकीय समिकरणं पाहता दुसऱ्या पक्षातील नेत्यांना घेतलं जात आहे. अनेक मतदारसंघात पक्षांतर सुरु आहे. अशातच काँग्रेसमधील एक महिला आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके या लवकरच अजित पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी लावले अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. अजित पवारांच्या बॅनरमुळे शहरात एकच चर्चा होत आहे. काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता टीव्ही 9 ने कालच दर्शवली होती. आता या बॅनरमुळे काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणार असल्याचं निश्चित होत आहे. आमदार सुलभा खोडके यांच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील आज अनेक विकासकामांच्या भूमिपूजनासाठी उपस्थित अजित पवार राहणार आहेत.
याआधीही अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत सुलभा खोडके या राष्ट्रवादीसोबत असल्याचं म्हटलं होतं. तर आता सुलभा खोडके यांनी अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या या दौऱ्यादरम्यान स्वागताचे बॅनर सुलभा खोडके यांच्याकडून लावण्यात आले आहेत. अमरावती विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचं अजित पवार उदघाटन करणार आहेत. अमरावती शहरातील जलशुद्धीकरण केंद्र तपोवन मधील वाढीव पाणी पुरवठा योजनाचे 865 कोटी रुपयांचा अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. 865.26 कोटींच्या अमृत- 2, सारथी केंद्र, डफरीन नूतन इमारत, क्रीडा मैदान, विविध विकास कामांची कोनशिला ठेवणार येणार आहे. अजित पवारांच्या या कार्यक्रमाला आमदार सुलभा खोडके उपस्थित आहेत. पण खोडके वगळता इतर लोकप्रतिनिधीची गैरहजेरी आहे.