अमरावती : अमरावतीच्या (Amravati News) चांदुर बाजार तालुक्यातील फुबगाव येथे अचानक पावसाच्या पाण्यामुळे घराची भिंत (Wall Collapse News) कोसळल्याने एकाच परिवारातील पाच जण दबले होते. या दुर्घटनेमध्ये मायलेकीचा मृत्यू झालाय. तिघाजणांना गावकऱ्यांनी बाहेर काढून त्यांना उपचारासाठी अमरावती हलवलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. तर मायलेकीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. पहाटेच्या सुमारास मुसळधार (Amravati Rain) पावसाने विटा आणि मातीच्या भिंती कोसळलाय. या वेळी घरात असणारे पाचही जण भिंतीखाली दबले गेले. तर आई-मुलगी यांचा जबर मार बसून त्याचा जीव गेला. यानंतर लगेचच स्थानिक बचाव पथकाला आणि यंत्रणांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनीही घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्य केलं. एकूण पाच जण दबले असल्याची माहिती बचाव पथकाला मिळाली होती. मात्र पाच पैकी तिघांनाच वाचवण्यात यश आलं. तर दोघांचा मृत्यू झाला.
चांदूर बाजार तालुक्यातील फुबगावातील वैराळे कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंंगर कोसळला. त्यांच्या घराची विटा आणि मातीची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत घरातील पाचही जण भिंतीखाली दबले गेले. त्यात चंदा वैराळे आणि पायल वैराळे यांचा मृत्यू झाला. तर नाराय़ण वैराळे, अरुण वैराळे आणि ओम वैराळे हे जखमी झाले. जखमीं तिघेही जण भिंतीखाली दबले गेले होते. त्यांना वाचवण्यात आल्यानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
चांदुर बाजार तालुक्यातील फुबगाव सैदापूर येथे ही दुर्घटना घडली. मंगळवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अरुण नारायण वैराळे यांचे घर पावसाने कोसळलं. त्यात पत्नी चंदा अरुण वैराळे (35), मुलगी पायल वैराळे (7)घटनास्थळी मृत्यू तर नारायण वैराळे,अरुण वैराळे,ओम वैराळे(१०) हे थोडक्यात बचावले. मात्र पत्नी आणि मुलीच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसलाय. पहाटे घडलेल्या या घटनेच्या वेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणतीही संधी या दुर्घटनेत वैराळे कुटुंबाला मिळाली नाही.