तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू…; बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 06, 2024 | 7:15 PM

Bachhu Kadu on CM Eknath Shinde : अमरावतीमध्ये बोलताना आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांबाबत एक विधान केलं आहे. त्यांचं हे विधान सध्या चर्चेत आहे. संतोष बांगर यांच्यावर टीका करताना बच्चू कडू यांची जीभ घरसल्याचं पाहायला मिळालं. वाचा सविस्तर...

तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू...; बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडू
Image Credit source: Facebook
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीत आमचे 20 आमदार जर निवडून आले आणि जर शेतकऱ्यांच्या हिताचे जर निर्णय झाले नाहीत. तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू असा म्हणण्याचा अर्थ होता. कारण मुख्यमंत्र्यांना उचलायला तर पाच सहा आमदार पाहिजे ना… जास्त म्हणून लोकांना अपील केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता संभाजीनगरला मोर्चाला येतील. अडीच ते तीन लाख लोक येतील, असं बच्चू कडू म्हणाले. अमरावती माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी हे विधान केलं आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.

बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांना विश्वास

भाजप हिंदुत्ववादी नारा देत आहे. काँग्रेस जातीचे नारे देत आहे. पण तरिही आम्ही शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग यांच्या साठी मोर्चा काढत आहोत आम्ही कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत राहणार आहोत, असं बच्चू कडू म्हणाले. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या आरोपांवर लक्ष देण्याची गरज नाही. आमचा एखादा छोटा कार्यकर्ता राणा यांच्या आरोपाला उत्तर देईल, असं म्हणत राणा दांपत्याच्या आरोपांवर बच्चू कडू यांनी उत्तर दिलंय.

आता न्यायालयावर फार माझा विश्वास राहला नाही. आता अपेक्षा पण नाही. ती यंत्रणा आता ढिसाळ झाली आहे. नवनीत राणा यांच्या अर्ज भरण्यापूर्वी निकाल लागतो. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात निकाल आमच्या बाजूने लागेल. अडसूळ यांनी न्यायालयात गेलं पाहिजे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही तर जागेसाठी संपूर्ण महाराष्ट्रावर दावा करतोय, असं बच्चू कडू म्हणाले.

बांगर यांच्यावर टीका

संतोष बांगर यांच्यावर टीका करताना बच्चू कडू यांची जीभ घरसली आहे. गरिबाचं घर सव्वा लाखाचं आणि तुमचं टॉयलेट पाच लाखांचं आहे तुम्हाला लाज वाटत नाही का? तरी कुणी विचारत नाही. असं कावड घेऊन महादेवाकडे निघाला तर महादेव त्रिशूल X@# मध्ये घालून देईल ना…, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाची चर्चा होत आहे.