Video | मंत्रिपदाने फरक पडत नाही, …तर उद्याच राजीनामा देतो; बच्चू कडू शेतकऱ्यांवर संतापले

| Updated on: Mar 12, 2022 | 7:45 AM

राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) हे अनेकदा आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. मला मंत्रीपदाने काही फरक पडत नाही, तुमची इच्छा असेल तर मी उद्याच राजीनामा देतो असे बच्चू कडू यांनी आंदोलक शेतकऱ्यांना म्हटले आहे.

Video | मंत्रिपदाने फरक पडत नाही, ...तर उद्याच राजीनामा देतो; बच्चू कडू शेतकऱ्यांवर संतापले
बच्चू कडू
Follow us on

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) हे अनेकदा आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. विदर्भाती प्रकल्पग्रस्त शेतकरी (Project affected farmers) आपल्या विविध मागण्यांसाठी आठवडाभरापासून अमरावतीत (Amravati) उपोषणाला बसले आहेत. मात्र तरी देखील मागण्या मान्य होत नसल्याने बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली. मात्र यावेळी बच्चू कडू यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. तुम्ही न्यायासाठी उपोषणाला बसला आहात की, माझ्या राजीनाम्यासाठी असा सवाल करत, मंत्रिपदाने मला फरक पडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुमची ईच्छा असेल तर उद्याच राजीनामा देतो असे देखील यावेळी कडू म्हणाले.

नेमंक काय म्हणाले बच्चू कडू?

विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसापासून उपोषण करत आहेत. शुक्रवारी रात्री भरपावसात या उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. आठ दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. यावरू बच्चू कडू यांनी संतपा व्यक्त केला आहे. तुम्ही इथं माझ्या राजीनामासाठी बसले आहात की? न्यायासाठी असा सवाल कडू यांनी उपस्थित आंदोलकांना केला. तुमची इच्छा असेल तर उद्याच मंत्रीपदाचा राजीनामा देतो, मला मंत्रीपदाने काही फरक पडत नाही, बच्चू कडू सर्वांचा बाप असल्याचे देखील त्यांनी म्हटले. या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

16 तारखेला बैठक

दरम्यान यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात 16 तारखेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आम्ही नक्कीच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढू, शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील.

संबंधित बातम्या

मनपा निवडणुका लांबणीवर! पाच राज्यांच्या निकालाने भाजप जोरात, काँग्रेसच्या उभेच्छुकांचा उत्साह मावळला?

‘मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे!’ निलेश राणेंचं सिंधुदुर्गात विधान

tv9 Poll : आता निवडणुका झाल्या तर कुणाला मतदान करणार? tv9 मराठीचा ऑनलाईन पोलचा निकाल ठाकरे सरकारसाठी धोक्याची घंटा?