अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या (Sant Gadge Baba Amravati University) उन्हाळी परीक्षा एक जूनपासून घेण्यात येणार आहेत. सर्व परीक्षा ऑफलाइन (Exam Offline) घेण्यावर विद्यापीठाने शिक्कामोर्तब केले आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील कोणतेही प्रश्न सोडवून गुण मिळण्याची मुभा राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. विद्यापीठात ऑफलाइन परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. पावणेदोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्याची मागणी असल्याने परीक्षा प्रचलित पध्दतीने होणार आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रतितासाला 15 मिनिटं वेळ जास्त मिळणार आहे. प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी (एमसीक्यू) राहतील. विविध विद्यार्थी संघटनाच्या (Students Union) आंदोलनावर विद्यापीठाचा मोठा निर्णय घेतला आहे.
अभियांत्रिकी, तांत्रिकी, फॉर्मसीच्या विद्यापीठ स्तरावरील प्रात्याक्षिक परीक्षा 1 ते 8 जूनदरम्यान होतील. लेखी परीक्षा 10 ते 30 जूनपर्यंत होतील. अभियांत्रिकी, तांत्रिकी, फॉर्मसीच्या महाविद्यालय स्तरावरील प्रात्याक्षिक परीक्षा 1 ते 8 जूनला होतील. 10 जून ते 30 जूनदरम्यान लेखी परीक्षा होतील. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यापीठ स्तरावरील प्रात्याक्षिक परीक्षा 6 जून ते 15 जूनदरम्यान होतील. तर लेखी परीक्षा 17 जून ते 10 जुलैदरम्यान होतील. तर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिक परीक्षा 6 जून ते 15 जूनदरम्यान होतील. लेखी परीक्षा 17 जून ते 19 जुलैदरम्यान होतील.
प्रश्नपत्रिकेत किंवा, अथवा असे प्रश्न विद्यार्थी सोडवू शकतील. म्हणजे दोन्ही प्रश्न सोडवू शकतील. या दोन्ही प्रश्नांचे मूल्यांकन होईल. एकूण प्रश्न मिळून प्रश्नपत्रिका 160 गुणांची होत असेल, तर विद्यार्थ्यांना कोणतेही 80 गुणांचे प्रश्न सोडवावे लागतील. यासंदर्भात बोलताना परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख म्हणाले, परीक्षांदर्भात माहिती प्राचार्यांना देण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.