अमरावती : गुढी पाडवा नवीन वर्षाची सुरुवात. सर्वत्र गुढीपाडव्याचा आनंद साजरा केला जात आहे. पण, अमरावतीत प्रकल्पग्रस्त (project affected) शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारली. कपाळावर काळ्या पट्ट्या बांधून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यातील मंत्र्यांविरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. 2013 च्या कायद्यानुसार शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी एक महिन्यापासून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ (Collector Office) आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने ठोस तोडगा न काढल्याने आंदोलक शेतकरी आक्रमक (Farmer Aggressive) झाले आहेत.
2006 मध्ये धरणाच्या प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला हा 2013 च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना द्यावा या प्रमुख मागणीसाठी विदर्भातील शेकडो शेतकरी अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या परिसरात मागील एक महिन्यापासून आंदोलन करत आहे. परंतु एक आंदोलनाला एक महिना पूर्ण होत असताना देखील राज्य सरकारकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर झाल्या नाही. त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आज आंदोलन मंडपातच राज्य सरकार विरोधात काळी गुढी उभारून काळा गुढीपाडवा साजरा केला. यावेळेस आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विदर्भातील लोकप्रतिनिधी, राज्यांतील सर्व मंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला. यावेळी आंदोलन शेतकऱ्यांनी कपाळावर काळ्या पट्ट्या देखील बांधल्या होत्या.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या वाढीव मोबदल्याची मागणी मान्य व्हावी यासाठी एक महिन्यापासून शेकडो शेतकरी रंगरगत्या उन्हात आंदोलन करत आहे. एकीकडे राज्यभर नवीन वर्षाचे स्वागत व गुढीपाडवा साजरा होत असताना शेतकरी मात्र आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहे. आज काळी गुढी उभारत त्या गुढीचे पूजन करत राज्य सरकार विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. मागील एक महिन्यापासून प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलनात आहेत. त्यामुळे त्याचे मूल घरी होते. दरम्यान या मुलांची शाळा ही तीन दिवसांपूर्वी आंदोलन स्थळी भरवली होती. पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते.