अमरावती : जिल्ह्याचे तापमान सध्या प्रचंड वाढले आहे. 42 ते 43 डिग्री सेल्सिअस अंशापर्यंत गेला आहे. अशाच महावितरणने (MSEDCL) अघोषित भारनियमन सुरू केल्याने नागरिक त्रस्त (citizens distressed) झाले आहेत. जिल्ह्यातील दर्यापूर, अंजनगाव, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर तिवसा मेळघाट आदी भागात सकाळी व सायंकाळी वीज कपात करण्यात येत आहे. आधीच उन्हाचा पारा वाढला. त्यात महावितरण केलेले लोडशेडिंग त्यामुळं नागरिकांचे चांगले हाल होतात. ग्रामीण भागात महावितरणकडून पुकारण्यात आलेल्या अघोषित भारनियमनामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या गर्मीच्या दिवसांमध्ये रात्री अपरात्री कधीही महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. तास-तासभर विद्युत पुरवठा खंडित (power outage) राहतो. संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना या संबंधी विचारले असता उडवा उडवीचे उत्तर मिळतात. अशी तक्रार परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. याचा नागरिकांनी अतिशय त्रास होत आहे. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पळवापळवीची उत्तरं दिली जातात. हा त्रास होता. दुपारी तापमान जास्त होता. त्यामुळं नागरिकांना खूप त्रास होत आहे, अशी व्यथा एका नागरिकानं बोलून दाखविली.
अमरावती जिल्ह्यात अघोषित भारनियमन सुरू आहे. सध्या उन्हाचा पारा वाढला असल्याने जिवाची लाही लाही होत आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला येथे रात्री 12 वाजता नागरिकांनी भारनियमनाचा जाब विचारण्यासाठी उपकेंद्रावर मोर्चा नेला. भारनियमन न थांबवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. दहा हजार लोकवस्तीचे लोकसंख्येचे आमला गाव आहे. लोडशेडिंग करताना ग्रामपंचायतला वेळापत्रक देणे गरजेचे असताना रात्री किंवा दिवसा ही महावितरण कंपनीने मनमानी करून भारनियमन सुरू केले आहे.