राणा दाम्पत्याच्या घरासमोर डफली बजाओ आंदोलन; पोलिसांचा कडक बंदोबस्त

| Updated on: Mar 04, 2023 | 1:19 PM

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलन केल्याचं संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी सांगितलं.

राणा दाम्पत्याच्या घरासमोर डफली बजाओ आंदोलन; पोलिसांचा कडक बंदोबस्त
Follow us on

अमरावती : खासदार नवनीत राणा व आमदार राणा यांच्या अमरावतीच्या निवासस्थानी शेकडो प्रकल्पग्रस्तांनी डफली बजाव आंदोलन केलं. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीसाठी विदर्भ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. राणा दाम्पत्याच्या घरासमोर निषेध नोंदवून निदर्शने केली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे. यासह प्रकल्पग्रस्ताचे सर्टिफिकेट देऊन शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करा. तसेच इतर मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी बाहेर येऊन शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं. सोबत चर्चा करत शासन दरबारी मागण्या लावून धरण्याच आश्वासन शेतकऱ्यांना दिलं.

निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त

यावेळी राणा दाम्पत्याच्या घरासमोर पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलन केल्याचं संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी सांगितलं. आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर प्रकल्पग्रस्त समितीनं हे आंदोलन केलं. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीनं डफली बजाओ आंदोलन केलं. रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त होता.

डफळी वाजवून दिले निवेदन

बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने पोलीस आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिलं होतं. अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त आमदार राणा यांच्या घरासमोर डफळी वाजवून निवेदन देणार असल्याचं सांगितलं होतं. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना वाचा फोडणे हा यामागील आंदोलनाचा हेतू आहे. या आंदोलनात सुमारे १०० प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते. सकाळी दहा वाजता राजापेठ बसस्थानक येथे एकत्रित आले. त्यानंतर आमदार व खासदार राणा यांच्या घरासमोर डफळी वाजवून निवेदन दिले.

अमरावती येते खासदार नवनीत राणा आहेत. आमदार रवी राणा आहेत. तरीही प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लागत नाही. त्या त्वरित मार्गी लागाव्यात, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने राणा दाम्पत्यांना निवेदन देऊन आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले.