अमरावती : विदर्भाची पंढरी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर (Shrikshetra Kaundanyapur) येथील माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. आज आमदार रवी राणा यांच्या हस्ते अमरावती शहरातील राजापेठ चौकात (Rajapeth Chowk) या पालखीचे स्वागत आणि पूजन करण्यात आले. यावेळी आमदार रवी राणा यांनी रुक्मिणीच्या पालखीत असलेल्या वारकऱ्यांना हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) वाटप केलं. सोबतच वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा मोह ही आमदार रवी राणा यांना आवरला नाही. यावेळी आमदार रवी राणा यांनी महिला वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. दरम्यान, यावर्षी शेतकरी सुखी समृद्धी होऊ दे चांगला पाऊस पडू दे असे साकडे ही आमदार रवी राणा यांनी माता रुक्मिणीच्या पालखीला घातलं?
आमदार रवी राणांची फुगडी रंगली pic.twitter.com/wJuxiNyaEB
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) June 7, 2022
आषाढी एकादशीला दरवर्षी पंढरपूरला सोहळा होत असतो. या आषाढी एकादशी सोहळ्याला महाराष्ट्रामधून शेकडो पालख्या जात असतायात. विदर्भाची पंढरी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरमधील रुक्मिणीच्या पालखीला पंढरपुरात मान आहे. मागील 428 वर्षापासून माता रुक्मिणीची पालखी ही दरवर्षी पंढरपूरला जात असते. यावर्षीही पालखी पंढरपूरच्या दिशेने तीन तारखेला रवाना झाली आहे. दरम्यान, या पालखी सोहळ्यामध्ये असलेली 62 वर्षीय वृद्ध आजीबाई मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण तिच्या डोक्यावर असलेला उलटा ग्लास त्यावर पाण्याने भरलेला हंडा आणि मुखात विठ्ठल रुक्मिणीचा नामाचा गजर होता. ही आजीबाई मागील दहा वर्षांपासून न चुकता पंढरपूरची वारी करत असते. यंदाही रगरगत्या उन्हात ही आजी पंढरपूरच्या दिशेने रुक्मिणीच्या पालखीसोबत निघाली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील माता रुक्मिणीचे माहेर घर असलेल्या कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे जात आहे. मागील अनेक वर्षापासून मंत्री यशोमती ठाकूर या अमरावतीच्या बियाणी चौकात या पालखीच जंगी स्वागत करत असतात. आजही मंत्री यशोमती ठाकूर यांनी या बियाणी चौकात रुक्मिणीच्या पालखीचे जंगी स्वागत केले. यावेळी टाळ-मृदुंगाच्या गजरात हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी यशोमती ठाकूरांनी टाळ-मृदुंगाचा गजर केला. या पालखीचे स्वागत व दर्शनासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक भाविक दाखल झाले होते. तसेच यावर्षी बळीराजा सुखी झाला पाहिजे तसेच ज्या लोकांनी इथं जातीवाद धर्मवाद निर्माण केला आहे तो संपू दे असं साकडं त्यांनी घातलं असल्याच त्यांनी सांगितलं.