अमरावती : अमरावतीच्या तिवसा तालुक्यात पोटच्या मुलांना बापाने दारू पाजल्याचे प्रकरण समोर आले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुऱ्हा पोलिसांनी मुलांना दारू पाजणाऱ्या बापावर गुन्हा दाखल करून अटक केली. गजानन डाहाके असे आरोपी बापाचे नाव आहे. आरोपी वर्धा जिल्ह्यातील देउरवाडा (Deurwada) येथील रहिवासी आहे. तिवसा तालुक्यातील (Tiwasa in Wardha District) कौडण्यपूर-अंजनसिंगी रोडवरील बारमधून दारू घेऊन लहान मुलांना दारू पाजली होती. कलम 77 अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा (Protection Act) अंतर्गत बापावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बार मालकाने कुऱ्हा पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली होती. व्हिडीओ व्हायरलं झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल महिला व बालविकास विभागाने घेतली आहे. याप्रकरणी आता दारू पाजणाऱ्या बापावर गुन्हा दाखल झाला. यानंतर या बापाची चौकशी महिला व बालविकास विभाग करणार आहे. तसेच मुलांनाही ताब्यात घेऊन त्यांना संरक्षण व काळजीपोटी बालगृहात पाठवण्याचे झाल्यास बालगृहात देखील पाठवले जाईल.
तिवसा तालुक्यातील एक बारमध्ये मद्यपी आला. त्याने दारू खरेदी केली. व्हिडीओनुसार, एक बाप खाली बसला आहे. त्याच्यासमोर एक अल्पवयीन मुलगाही दारु पितोय. एका लहान मुलाच्या हातात दारुचा ग्लास दिसतो. हे बाळ अतिशय लहान आहे. बाप मुलाला दारुचे घोट पाजतोय. चकणाही भरवताना बाप दिसतो. या व्हिडीओत एक मुलगीही दिसते. तिच्या हातात बिअरची बाटली आहे. अल्पवयीन मुलगाही ग्लासमधून दारु पिताना दिसतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाप नेमकं आपल्या पोरांवर कसले संस्कार करतोय, यावरून चर्चा सुरू झाल्यात.