एकाही हल्लेखोरांना सोडणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. मी शांत होते तरी देखील मला बघून काही लोकं आक्षेपार्ह घोषणाबाजी करत होते. मार देंगे काट, देंगे म्हणत होते. काही लोकांनी माझ्यावर थुकंन्याचा प्रयत्न केला. मारहाणीमध्ये माझ्या अंगरक्षकाला खुर्ची लागल्या. त्यांची भाषा कापण्याची असेल तर आमचीही तशीच राहील आम्ही शांत बसणार नाही. कोणी एका गालावर मारेल तर आम्ही दोन मारेल आता हिंदू शांत बसणार नाही. खल्लार गाव हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षच गाव आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.
माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सभेत राडा प्रकरणाला आता नवं वळण आहे. आरोपीवर नवनीत राणा यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न तसेच अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झालेत. आतापर्यंत 4 हल्लेखोरांना अटक तर फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं आहे. काल रात्री नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत खुर्च्याची फेकाफेक करून तुफान राडा झाला होता.
शिवसेना शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत राडा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारच्या घटना दुर्दैवी आहे त्या घडू नये. पण नेहमी नवनीत राणा सोबत हे का घडतं हा प्रश्न आहे. नवनीत राणा यांचे उमेदवार घाबरले आहे ते चिंतेत आहे. मतांचं ध्रुविकरण करण्यासाठी आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा नवनीत राणा यांचा डाव आहे, असं अभिजीत अडसूळ म्हणालेत.
अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन आलं होतं. ही प्रचार सभा सुरु असतानाच मोठा राडा झाला. सभेसाठी आलेल्या काही लोकांनी खुर्च्या फेकत धुडगूस घातला. नवनीत राणा यांनी त्यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्याचा आरोप केला. पोलिसांनी या प्रकरणात 45 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चार जणांना ताब्यात घेतलं आहे.