अमरावती : मनपा आयुक्त शाई फेक प्रकरणी (Ink throwing case) चार आरोपींसंदर्भात तेवीस तारखेला तर रुग्णालयात असलेल्या आरोपी संदर्भात आता एकवीस फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. पोलिसांनी जवाब न पाठवल्याने सुनावणी लांबली (hearing postponed) आहे. अशी माहिती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या वकिलांनी दिली. अजय बोबडे, संदीप गुन्हाने, सुरज मिश्रा, महेश मुलचंदनी हे या प्रकरणातील आरोपी आहेत. हे सर्व आरोपी अमरावती कारागृहात आहेत. तर विनोद येवतीकर हा आरोपी रुग्णालयात दाखल आहे. या प्रकरणी अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यावर देखील केस दाखल करण्यात आली होती. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा नसतानादेखील त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल करण्यात आला, असा प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी विचारला. पोलिसांनी याचे उत्तर द्यावे, असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केलाय. पालकमंत्र्यांच्या दबावामुळे आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी नवनीत राणा यांची भेट नाकारली. कारण राणा यांच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांवर शाई फेकली होती. पोलिसांवर मुंबईवरून अमरावतीत दबाव देण्यात आला. त्यामुळं आयुक्तांनी मला भेट नाकारल्याचंही नवनीत राणा म्हणाल्या होत्या. नवनीत राणा या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. नवनीत राणा या पोलिसांकडून शाईफेकीची माहिती घेतली.
राजापेठ उड्डाणपुलावरील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाही फेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्या सह 11 कार्यकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मुख्यमंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या दबावात रात्री उशिरा दाखल करण्यात आले होते. मनपा आयुक्तांनी खोटी तक्रार दिली. पोलीस आयुक्तांनी देखील त्या तक्रारीची शहनिशा न करता हत्येचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल केले. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजतेय.