अमरावती : विदर्भात मान्सून कोसळतोय. अमरावतीतही आज मान्सून कोसळला. अमरावतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान (Loss) झालंय. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) विकायला आणलेला शेतमाल पावसात भिजला. त्यामुळं शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झाले. पेरणीचे (Sowing) दिवस असल्यानं मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेतमाल बाजार समितीमध्ये आणत आहेत. मात्र, बाजार समितीकडून शेतमाल ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
15 ते 20 मिनिटं मुसळधार पाऊस झाला. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. यापूर्वी आलेल्या पावसात धान्य भिजलं. आज पुन्हा पाऊस गेल्यानं शेतमालाचं नुकसान झाल्याचं एका शेतकऱ्यानं सांगितलं. बऱ्याच शेतकऱ्यांचं या पावसात नुकसान झालंय. राजकारण्यांनी निवडणुकीत व्यस्त राहण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष द्यावं. शेतकऱ्यांचं कष्ट शेतकऱ्यांनाच माहिती आहेत, अशी टीका एका शेतकऱ्यानं केली.
अमरावतीत आलेल्या धुव्वादार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणलेला हजारो क्विंटल शेतमाल पावसाने भिजला. मुसळधार पावसामुळे शेतमाल पाण्याने वाहत गेला. पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर आणतात शेतमाल. बाजार समितीकडून उपाय योजना होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पावसामुळं शेतकरी कामाला लागला आहे. शेतमाल विकून दोन पैसे हातात येतील. शेतातली कामं सुरू करता येतील, अशी शेतकऱ्यांना आस होती. त्यासाठी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल आणून ठेवला. पण, त्याठिकाणी शेतमाल ठेवण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळं शेतमाल भिजला. यात नुकसान शेतकऱ्यांचंच झालं.
अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. गावातील रस्त्यांवरुन पाणी वाहून गेले. रस्त्यालगतच्या अनेक घरांत पाणी घुसले. पाण्यातून दुचाकी वाहत चालविताना नागरिकांची चांगलीच दमछाक झाली. अचानक आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री झाली.