अमरावती : आमदार रवी राणा म्हणाले, या महाराष्ट्रावर सातत्याने संकट सुरू आहे. त्यासाठी 23 तारखेला मातोश्रीवर जाऊन शांततेने हनुमान चालीसा वाचन करणार आहोत. मोजकेच कार्यकर्ते घेऊन मी मातोश्रीवर जाणार आहे, अशी माहिती आमदार रवी राणा यांनी आज दिली. राणा म्हणाले, दोन-अडीच वर्षांपासून राज्यावर साडेसाती सुरू आहे. ती शांत करण्यासाठी हनुमान चालीसा म्हणणे आवश्यक आहे. पोलिसांच्या (Police) माध्यमातून आम्हाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती रवी राणा यांनी व्यक्त केली. रवी राणा म्हणाले, मुख्यमंत्र्यांजवळ (CM) पोलीस आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुंबईला ( Mumbai) जात असताना आम्हाला अडवलं. सत्ताचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री यांनी केला. शनिवारीसुद्धा पोलिसांवर दबाब आणून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
हनुमान जयंती झाली. तरी हनुमान चालीसावरून तयार झालेला वाद काही संपण्याची चिन्ह नाहीत. राणा दाम्पत्यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून अमरावतीत वाद सुरू आहे. अमरावतीतील शिवसैनिक आक्रमक झालेत. त्यांनी रवी राणा यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना अडवलं. यावेळी शिवसेनेच्या महिलांनी राणा यांच्या घरासमोर बांगड्या फेकल्या होत्या.
आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार असल्याची घोषणा केली होती. आता त्यांनी शनिवारी मातोश्रीवर काही कार्यकर्त्यांसह जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचं सांगितलं. पोलीस आपल्याला अटक करू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शनिवार हा हनुमानाचा दिवस मानला जातो. त्यामुळं शनिवारी आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणू असं रवी राणा यांनी आज जाहीर केलं. जाताना पोलीस आपल्याला अटक करू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तरीही मोजक्या कार्यकर्त्यांना आपण सोबत घेऊन जाऊ. शांततेत हनुमान चालीसा म्हणू. राज्यावर गेल्या काही दिवसांपासून संकट आली आहेत. ही संकट दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करून धार्मिक अधिष्ठान पूर्ण करू, असं रवी राणा यांनी सांगितलं.