अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमान चालीसाचं पठण केलं. यावेळी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली. उद्धव ठाकरे किस खेत की मुली हैं, असा उल्लेख नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. आगामी निवडणुकीत नवनीत राणा यांना दाखवून देऊ की किस खेत की मुली. यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रत्यूतर दिलंय.
नवनीत राणा म्हणाल्या, संजय राऊत हे माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत. संजय दादा आपण किती निवडणुका निवडून आले? संजय राऊत यांना साधा कार्यकर्तासुद्धा निवडणुकीत हरवू शकतो. एखाद्या साधा कार्यकर्ता जो मातीशी जुळून आहे, तोसुद्धा संजय राऊत यांना निवडणुकीत पराभूत करू शकतो. नेत्याला जुळण्यापेक्षा मातीशी जुळणारा व्यक्ती संजय राऊत यांना निवडणुकीत नक्कीच हरवू शकतो.
नवनीत राणा यांनी सांगितलं की, मला आरोपी बनवण्याचं काम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मी हनुमान चालीसा वाचलं म्हणून माझ्यावर देशद्रोह आहे. हनुमान चालीसा वाचलं म्हणून मला जेलमध्ये टाकलं. ठाकरे गटाचे लोकं म्हणतात. आमच्या भरोश्यावर ते निवडणुका जिंकून आले.
त्यावर उत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या, माझ्या क्षेत्रातील लोकांना ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाडलं. ते इतके वर्षे खासदार होते. संघर्षातून मी इथपर्यंत आली आहे. जमिनीशी जुळून मी निवडून आली. महाराष्ट्राच्या परंपरेला तोडण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महिला आणि लोकप्रतिनिधी अशा व्यक्तीला जेलमध्ये टाकलं. तरीही मी खचले नव्हते. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी त्यावर उत्तर द्यावं.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी लोकांमध्ये निवडणूक लढवावी. त्यांच्याविरोधात मी लढेन. लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा कार्यकर्ता निवडून येतो. मंचावर फक्त भाषण करणारा नेता निवडून येत नाही. याबाबत मी आवाहन केलं होतं. त्यावर त्यांनी उत्तर द्यावं, असं आवाहनही नवनीत राणा यांनी केलं.