अखंड भारत तर झालाच पाहिजे; त्याचा जल्लोष जोरदार करणार; नवनीत राणा म्हणतात मोहन भागवतांचे आम्ही समर्थन करतो

| Updated on: Apr 14, 2022 | 7:20 PM

मोहन भागवत गेल्या अनेक दिवसांपासून लोकांसाठी काम करत आहेत. त्याच बरोबर ते भारतासाठीही काम करत असून त्यांच्या विचारांचे आम्ही समर्थन करतो असे सांगत ज्या दिवशी अखंड भारताचे स्वप्न साकार होईल त्यादिवशी आम्ही सगळे जोरदारपणे जल्लोष साजरा करु

अखंड भारत तर झालाच पाहिजे; त्याचा जल्लोष जोरदार करणार; नवनीत राणा म्हणतात मोहन भागवतांचे आम्ही समर्थन करतो
मोहन भागवतांच्या अखंड भारत या वक्तव्याचे राणा यांच्याकडून समर्थन
Image Credit source: TV9
Follow us on

अमरावतीः मोहन भागवत (Mohan Bhagwat) ही व्यक्ती खूप अभ्यासू आणि देशासाठी खूप वर्षापासून काम करत आहे. त्यांच्या या विचाराचे आम्ही समर्थन करत असून त्यांच्या या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत असे मत भाजपच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी त्यांना मोहन भागवत यांनी नुकताच केलेल्या अखंड भारत (Akhand Bharat) या विधानाच्या पार्श्वभूमी प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांच्या विचाराचे आम्ही समर्थन करत असून मोहन भागवत यांनी सांगितल्या प्रमाणे 15 वर्षात नाही तर त्याआधी अखंड भारतासाठी झाला पाहिजे असेही वक्तव्यही त्यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखंड भारताच्या मुद्यावरुन एक मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी सनातन धर्म हाच हिंदू राष्ट्र असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी पुढील 15 वर्षात भारत अखंड होणार असल्याचे सांगत हे स्वप्न आपण आपल्या डोळ्यांनी पाहू असेही म्हटले आहे. एवढेच नाही तर संत आणि ज्योतिष्य यांच्या म्हणण्यानुसार 20 ते 25 वर्षात भारत अखंड भारत होईलच, पण आपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न केले तर अखंड भारताचे हे स्वप्न पुढील 10 ते 15 वर्षात साकार होईल असे वक्तव्य केले होते.

विवेकानंदाचे स्वप्न साकार करु

या मुद्याला धरुनच पत्रकारांनी खासदार नवनीत राणा यांना सवाल उपस्थित केला असता त्यांनी त्यांचे समर्थन करत सांगितले की, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या विचारामुळे भारताचे एकही अंग बाजूला राहता कामा नये तर भारत हा अखंड भारत झाला पाहिजे या स्वामी विवेकानंदाचे स्वप्न साकार करु असेही त्यांनी सांगितले. हे अखंड भारताचे स्वप्न दहा पंधरा वर्षात पूर्ण झाले तर आम्ही त्याचा जल्लोष जोरदार केला जाईल असेही नवनीत राणा यांनी मत मांडले.

विचारांचे आम्ही समर्थन करतो

खासदार नवनीत राणा यांनी सांगितले की, मोहन भागवत गेल्या अनेक दिवसांपासून लोकांसाठी काम करत आहेत. त्याच बरोबर ते भारतासाठीही काम करत असून त्यांच्या विचारांचे आम्ही समर्थन करतो असे सांगत ज्या दिवशी अखंड भारताचे स्वप्न साकार होईल त्यादिवशी आम्ही सगळे जोरदारपणे जल्लोष साजरा करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

जेम्स लेनचे पुस्तक वादग्रस्तच; पुरंदरे यांची हकनाक बदनामी सुरू, पवार आत्ताच का याच राजकारण करत आहेत

TOP 9 Headlines | 14 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

Video : अंगावरून अख्खी रेल्वे गेली पण पोरीने फोनवर बोलणं सोडलं नाही!, व्हीडिओ पाहून काळजात धस्स होईल…