Navneet Rana : नवनीत राणांना शिवसेना जशास तसं उत्तर देणार, हनुमान चालीसाला उत्तर महाआरतीने

| Updated on: May 11, 2022 | 4:15 PM

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दिल्लीत काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी हनुमान मंदिरात महाआरती व हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहीर केले, राणा दाम्पत्याच्या या आव्हानाला प्रतिआव्हान अमरावतीच्या शिवसैनिकांनी दिले आहे.

Navneet Rana : नवनीत राणांना शिवसेना जशास तसं उत्तर देणार, हनुमान चालीसाला उत्तर महाआरतीने
रवी राणा, नवनीत राणा
Image Credit source: TV9
Follow us on

अमरावती : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. सुरूवातील राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशीदीवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालीसा अशी हाक दिली. तर दुसरीकडे भाजपनेही या भूमिकेचं समर्थन केलं. मात्र काही दिवसातच राणा दाम्पत्याने हनुमान चालिसाचा (Hanuman Chalisa) मुद्दा पुन्हा उचलत राज्यात रान पेटवलं. त्यानंतर जे झालं ते संपूर्ण देशाने पाहिलं. नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांची जेलवारी आणि त्यानंतर झालेले राजकीय आरोप अजूनही देशात चर्चेचा विषय आहे. मात्र आता शिवसेनेनेही राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत जशाच तसे उत्तर देण्याचं ठरवलं आहे. शिवसेना राणा यांच्या हनुमान चालिसाला उत्तर हे महाआरतीने देणार आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दिल्लीत काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी हनुमान मंदिरात महाआरती व हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहीर केले, राणा दाम्पत्याच्या या आव्हानाला प्रतिआव्हान अमरावतीच्या शिवसैनिकांनी दिले आहे.

शिवसेना महाआरती करणार

अमरावती जिल्ह्याच्या विकासावर लक्ष न देता, पेट्रोल डिझेल व गॅसच्या वाढलेल्या दरावर केंद्र सरकारवर चकार शब्दही न बोलनाऱ्या आमदार-खासदार जोडीला सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना अमरावती महानगराच्या वतीने अमरावती येथील जागृत पांढरी हनुमान मंदिर येथे 14 मे रोजी सकाळी 9 वाजता महाआरती करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिली. त्यामुळे आता पुन्हा अमरावतीच्या राजकारणासह देशाचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा काय म्हणाल्या होत्या?

तर शिवसेनेवर टीका करताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्रात संकट आहे. ते दूर व्हावं अशी प्रार्थना करणार आहे. कोणत्या जिल्ह्यात गेले – कोणत्या शेतकऱ्यांना भेटले? किती प्रश्न आहेत महाराष्ट्रात? ते सोडून नवनीत राणा यांची एमआरए चौकशी करत आहेत. तसेच अॅक्टर लोकांच काही ग्रेड नसतात. मला त्यावर काही बोलायची गरज नाही, उद्धव ठाकरे यांना जे मी प्रश्न विचारले त्यांवर उत्तर द्यावे, असेही नवनीत राणा म्हणाल्या आहेत. तसेच ते लढले पाहिजेत, त्यांच्या विरोधात मी लढेन. बाळासाहेबांना किती त्रास होत असेल. त्यांचे पुत्र असे वागत आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. जन्म दिला ते एवढे चौकशी करत नाहीत, तेवढी उद्धव ठाकरे करत आहेत, महिलांची पर्सनल चौकशी करत आहेत, असे म्हणत राणा यांनी हल्लाबोल चढवला होता.

हे सुद्धा वाचा