शरद पवार विदर्भात जाणार अन् शिंदेंच्या जवळच्या ‘या’ नेत्याला भेटणार?; काय कारण?

| Updated on: Dec 27, 2023 | 1:20 PM

NCP Leader Sharad Pawar on Amravati : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज आणि उद्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाला भेटणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. या भेटी मागचं कारण काय? हे अद्याप कळू शकलेलं नाही. वाचा सविस्तर...

शरद पवार विदर्भात जाणार अन् शिंदेंच्या जवळच्या या नेत्याला भेटणार?; काय कारण?
Follow us on

स्वप्नील उपम, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, अमरावती 27 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने देण्यात येणारा पहिला पुरस्कार आज नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांना दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार अमरावतीत येत आहेत. याच दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटच्या एका नेत्याला शरद पवार भेटणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार कुणाला भेटणार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तीला भेटणार आहेत. उद्या आमदार बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा इथल्या निवासस्थानी शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट होणार आहे. उद्या शरद पवार हे परतवाड्याला जात असताना बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णातील निवासस्थानी भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘हा’ नेता पवारांना भेटणार

थोड्याच वेळात शरद पवार यांचं अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे. या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रिपाईं गवई गटाचे नेते राजेंद्र गवई हे शरद पवारांच्या भेटीला पोहोलेत. आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी मधून लढवण्यास राजेंद्र गवई इच्छूक आहे. या भेटीत काय होतं? पाहणं महत्वाचं असेल.

शरद पवार यांचा अमरावती दौरा

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांची आज 125 जयंती रोप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरं होत आहे. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस्थळावर भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालय संस्था यावर सुद्धा विद्युत दुरुस्त करण्यात आली असून आज त्यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहना करता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत.