Nitin Gadkari: देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केले नाही तर मुलं कसे होणार? – नितीन गडकरी

| Updated on: Jul 19, 2022 | 7:25 AM

अमरावती, बेधडक वक्तव्यांमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) नेहमीच चर्चेत असतात.  मात्र, अमरावती येथे एका कार्यक्रमात गडकरी यांनी केलेल्या “लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही तर मुलं कशी होणार? (Controversial statement in Amravati) या वक्तव्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी गडकरी यांनी ‘तुम्हाला देवाचा आशीर्वाद असून भागत नाही. देवाचा आशीर्वाद आहे आणि […]

Nitin Gadkari: देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केले नाही तर मुलं कसे होणार? - नितीन गडकरी
Follow us on

अमरावती, बेधडक वक्तव्यांमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) नेहमीच चर्चेत असतात.  मात्र, अमरावती येथे एका कार्यक्रमात गडकरी यांनी केलेल्या “लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही तर मुलं कशी होणार? (Controversial statement in Amravati) या वक्तव्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी गडकरी यांनी ‘तुम्हाला देवाचा आशीर्वाद असून भागत नाही. देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही, तर पोरं कशी होणार? तुम्हालाही काही पुढाकार घ्यावाच लागेल, असं वक्‍तव्य केलं. गडकरींच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. त्यावर गडकरी यांनी, माझ्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढू नका, फक्त प्रयत्नवादी व्हा, एवढंच आपल्याला सांगायचं आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी पुढे दिले.

शेती आपल्याला अशी करायची आहे की, प्रथम क्रमांकावर शेती, द्वितीय क्रमांकावर व्यवसाय आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी असं असलं पाहिजे. तुम्ही मनात आणलं तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारे प्रॉडक्टिव्हिटी वाढवून आणि खर्च कमी करून जागतिक बाजारपेठेत तुम्ही पोहोचू शकता. विलास शिंदे लंडनच्या बाजारात द्राक्षे पाठवत आहेत, तर आपली संत्री का जात नाही? आपण कशामुळे मागे का आहोत? याला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात, असं नितीन गडकरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा

एकरी 20 क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे. मी प्रयत्न करून हरलो, मला 5 क्विंटलच्या वर जाता आलं नाही. एकरी 20 क्विंटल कापूस झाला पाहिजे. हे करणार असाल तर तुमचा उपयोग आहे, नाहीतर सहावं-सातवं वेतन देऊन आम्ही काय करायचं? बाप दाखवा, नाहीतर श्राद्ध करा, हे उत्पादन कसं वाढवायचं हे आम्हाला सांगा, असं म्हणत गडकरी यांनी कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर ताशेरे ओढले.