अमरावती : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप सुरू होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून हा संप मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. हा संप मागे घेण्याच्या घोषणेनंतर आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये आता दोन गट पडले आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेचा आम्हाला निर्णय मान्य नाही अशी भूमिका आता काही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेची भूमिका मान्य नसल्याने हा संप सुरूच राहणार आहे अशी भूमिका आता अमरावती जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता कर्मचारी हा संप सुरुच ठेवणार की मागे घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
संपूर्ण राज्यभरात सात दिवसांपासून जुन्या पेन्शनसाठी काम बंद आंदोलन सुरू होते. मात्र आज कर्मचाऱ्यांची मध्यवर्ती संघटना व राज्याचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला, असे जाहीर करण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने ही भूमिका घेतल्याने राज्यातील काही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी या भूमिकेविरोधात आवाज उठविला आहे.
त्यांनी जरी हा संप मागे घेतला असला तरी आम्ही हा संप मागे घेणार नाही अशी भूमिका अमरावती जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने घेतलेला निर्णय आम्हाला विश्वासात न घेता घेतला गेला आहे. त्यामुळे हा निर्णय आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला पूर्णपणे जुनी पेन्शन पाहिजे असा इशाराच सरकारला दिला आहे.
आम्हाला विश्वासात न घेता हा संप मागे का घेतला?असा संतप्त सवालही अमरावती जिल्ह्यातील सर्व संघटनांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात हा संप सुरूच राहिल, आमचा विश्वासघात करण्यात आला असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
हा निर्णय मान्य नसल्याने जुनी पेन्शन मध्यवर्ती समिती आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाचा अमरावतीमध्ये कर्मचाऱ्यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला आहे.