अमरावती : खासदार नवनीत राणा म्हणाल्या, शिवसैनिकांच्या स्वागतासाठी हार अर्पण केलं. सरबत देऊन शिवसैनिकांचे (Shiv Sainik) स्वागत करण्यात आले. महाराजांना बोलावलं. पुस्तक बोलावले. ते इथं आले तर आपण सर्वजण हनुमान चालीसाचं वाचन करू. मी अमरावती जिल्ह्यातील लोकांचं प्रतिनिधीत्व करते. पण, शिवसैनिकांनी हनुमान चालीसा वाचन करण्याचा प्रयत्न केला नाही. नवनीत राणा आणि रवी राणा (Ravi Rana) मुर्दाबाद अशाप्रकारचे नारे दिले. हिंदुत्ववादी विचारधारेची आठवण करून दिली तर मी माझ्या धर्माचा प्रचार प्रसार करत असेन. त्यासाठी मला मुर्दाबाद म्हटलं जात असेल तर त्याचं मी स्वागत करते. मी मुर्दाबाद आहे. त्यात काही दुःख वाटत नाही. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारा की, जी विचारधारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. त्या विचारधारा महाविकास आघाडीत गेल्यानंतर संपली काय, असा सवाल नवनीत राणा यांनी विचारला. स्वार्थापोटी हिंदुत्वाची विचारधार संपली काय, लालसेपोटी ही विचारधारा संपली काय, असा प्रश्नही नवनीत राणा यांनी विचारला.
बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा खऱ्या अर्थानं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चालवत आहेत. त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांची जागा लवकरच राज ठाकरे घेतील, असं मोठं विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं. शिवसैनिकांना राणा यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना शिवसैनिकांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर नवनीत राणा बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आम्ही आवाहन दिल्यानंतर एक आरती आणि हनुमान चालीसाही मुख्यमंत्री म्हणू शकत नाही. हनुमान चालीसाचं वाचनसुद्धा करू शकत नाही. उद्धव ठाकरे साहेब तुम्ही तुमची विचारधारा सोडली असल्याच्या भ्रमात महाराष्ट्र आहे. ही गोष्ट काल स्पष्ट झालं.
मला वाटतं राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची जागा घेणार. कारण राज यांनी बाळासाहेबांची विचारधारा घेऊन चालत आहेत. अजूनही ते संघर्ष करत आहेत. बाळासाहेबांची विचारधारा आजही आमच्या डोक्यात आहे. त्याच विचारधारेवर आम्ही चालणार आहोत. कुणी लालसेपोटी विसरत असेल. तर त्याची आठवण करून देण्यासाठी जे होईल ते आम्ही करू. मुंबईला देवाच्या नामस्मरणासाठी कुणी जात असेल तर त्यांना जाऊ दिलं पाहिजे. आम्ही मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसाचं वाचन करणार, असं ठरविलं आहे. यासाठी कार्यकर्ते तयार आहेत. ते आम्ही करणारचं, याचा पुनरुच्चारही नवनीत राणा यांनी केला.