अमरावती : गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, या हेतूने राज्य सरकारने यावर्षी दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा दिला. काही ठिकाणी तो वेळेवर मिळाला. पण, काही ठिकाणी तो उशिरा मिळाला. आता गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा देणार असल्याची घोषणा केली. परंतु गुढीपाडवा एक दिवसावर येऊन ठेपला असला तरी अमरावती जिल्ह्यामधील एकाही गोडाऊनमध्ये आनंदाचा शिधाच पोहचला नाही. त्यामुळे दुकानात शिधावाटप झालं नाही.
आनंदाचा शिधा घेण्यासाठी मोठ्या आशेने आलेल्या गोरगरीब कुटुंबांच्या निराश होऊन वापस जावं लागत आहे. आज सकाळपासूनच अमरावती शहरातील रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा घेण्यासाठी गोरगरीब ग्राहकांनी गर्दी केली होती. परंतु दुकानात शिधाच आला नसल्याने ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
सरकारला शिधा द्यायचा होता तर मग गुढीपाडव्याच्या पूर्वी का दिला नाही, असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण वीस गोडाऊन आहे. या वीस गोडाऊनपैकी एकाही गोडाऊनमध्ये आनंदाचा शिधा पोहोचला नाही. जिल्ह्यातील साडेपाच लाख कुटुंब शिधापासून तुर्तास वंचित राहणार आहे.
गुढीपाडव्यानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. पण सरकारी संपाचा परिणाम या शिधा वाटपावर झाला. गेली आठवडाभर सरकारी कर्मचारी संपावर होते. याचा परिणाम शिधा वाटपाला आता उशीर होणार आहे. उद्या गुढीपाडवा असला, तरी काही ठिकाणी अद्याप शिधा पोहचलेला नाही.
आनंदाच्या शिधावाटपाला उशीर होणार आहे. उद्या गुढीपाडवा आहे. सर्वसामान्यांचा गुढीपाडवा गोड व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून शिधा वाटप केले जाणार होते. पण, काही ठिकाणी शिधा पोहचला नाही. त्यामुळे त्यांचा गुढीपाडवा काही गोड होणार, असे दिसत नाही.
राज्य सरकारने गुढीपाडव्याला सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली. मात्र अद्यापही रेशन दुकान आणि शासकीय गोडाऊनमध्ये आनंदाचा शिधा पोहचलेला नाही. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातच अद्याप आनंदाचा शिधा पोहचलेला नसल्याच रिअँलीटी चेकमधून समोर आलय. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना मोफत तांदूळ आणि गहू दिले जात आहेत.