अमरावतीः शरद पवार (Sharad Pawar) यांनी विदर्भाचा दौरा केला असला तरी त्यांनी विदर्भाला काहीच दिलं नाही. विदर्भाच्या दौऱ्यावर येऊनही त्यांनी विदर्भाच्या अनुशेशाबद्दल ते काहीच बोलले नाही, त्यामुळे शरद पवार यांचा साहेबांचा दौरा विदर्भाची (Vidarbh) निराशा करणारा होता अशी टीका भाजपचे आमदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भाचा दौरा केला त्यावर जोरदार टीका भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी केली. शरद पवारानी काटोलमध्ये शेतकऱ्यांना दिलेले वचन विसरले आहेत. शरद पवार यांनी यांनी विदर्भ केला त्यावेळी हिंदुचा रामनवमी हा सण होता, मात्र या दौऱ्यात त्यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, त्यामुळे हिंदुचा अपमान करणारा हा दौरा होता अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
शरद पवार यांनी एवढा मोठा दौरा करुनही आणि हिंदूचा सण असूनही त्यांनी आपल्या कार्यक्रमात एकही फोटो लावला नाही. या सणाऐवजी ईद असती तर शुभेच्छा दिल्या असत्या अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
संपूर्ण देश काल रामनवमीचा आनंदोत्सव साजरा करत होता. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात एकाही नेत्याने शुभेच्छा दिल्या. बकरी ईद राहली असती तर आवर्जून शुभेच्छा दिल्या असत्या, हे म्हणतात हिंदूला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न होतो आहे. जर तुम्ही हिंदूंना शुभेच्छा देणार नाही तर अस्वस्थ होईलच ना? pic.twitter.com/rPzQT54220
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) April 11, 2022
शोमती ठाकूर यांनी रविवारी शरद पवार यांच्याबद्दल एक ट्विट केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असते. या ट्विटला अनुसरुनही अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला. त्यांच्या या ट्विटवरुन त्यांना आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही काम करत नाहीत, हे यशोमती ठाकूर यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. यशोमती ठाकूर यांना हे सांगायचं असेल की तुम्ही रिमोट कंट्रोलने शरद पवार सरकार चालवतात त्यामुळे त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटत असावे अशी टीका त्यांनी यशोमती ठाकूर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आघाडी सरकारमधील जे दोन मंत्री तुरुंगात आहेत, त्यावरही त्यांनी टीका केली.
पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही @PawarSpeaks @bb_thorat @OfficeofUT @AjitPawarSpeaks pic.twitter.com/NE79YEJQZc
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 10, 2022
यावेळी ते म्हणाले की, यशोमती ठाकूर काहीच चुकीचं बोलल्या नाहीत, दोन दोन मंत्री यांचे जेलमध्ये असल्याचे सांगितले. अनिल बोंडे यांनी त्यांच्या दौऱ्याबद्दल धार्मिक मुद्दा बनवून त्यांनी रामनवमीनिमित्ताने एकही हिंदूला काल त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
तर अमोल मिटकरी यांच्याविरोधात मी तक्रार देणार असून त्यांनी माझ्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. अमोल मिटकरी त्या पक्षात राहून लाल चाटण्याचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मंत्री यशोमती ठाकूर ह्या जनतेच्या मनातील बोलल्या, ह्यांच्यापेक्षा दुसरा कोणीही मुख्यमंत्री राहिला असता तर आजची परिस्थिती वेगळी असती. कारण मुख्यमंत्र्याचा प्रशासनावर वचक नाही, मुख्यमंत्री पद सांभाळू शकत नाही, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अराजक माजला आहे. pic.twitter.com/Z0UmNqrJqZ
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) April 11, 2022
शरद पवार यांनी विदर्भाचा दौरा केला कारण त्यांना स्वतःची आरती ओवाळून घ्यायची होती म्हणत देवेंद्र भुयारने स्वतःची गाडी स्वतः जाळली, असा फसवणूक करणारा माणूस तो आहे म्हणत अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्या दौऱ्याबद्दल जोरदार टीका केली.
संबंधित बातम्या
24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु राहणार बँक! सुट्टीची चिंता नको, कधीही उरका बँकेची कामं
Anand Dave : ‘हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले’