मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज…, देवेंद्र भुयार यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Oct 21, 2022 | 4:34 PM

अलिबाबा चाळीस चोराच्या सरकारने आमचा कोट्यवधीचा निधी रोखला आहे.

मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज..., देवेंद्र भुयार यांचं मोठं वक्तव्य
देवेंद्र भुयार यांचं मोठं वक्तव्य
Follow us on

अमरावती : मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केलं. ते अमरावती येथील कार्यक्रमात आज बोलत होते. तुमची दहशत नदीच्या काठापर्यंत . आमच्या नादाला लागायचं नाही. निवडणुकीमध्ये जाणीवपूर्व तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्याला धक्का लावण्याचं काम केलं, तर तलवारीनं हात छाटल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे, असा इशाराही देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी विरोधकांना दिला.

देवेंद्र भुयारच्या नादाला लागू नका. भुयारच्या नादाला लागलात तर तुमची पाटीलकी काढल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिली.

देवेंद्र भुयार म्हणाले, 50 गद्दार गुजरात मार्गे गुवाहाटीला गेले आणि चांगलं सरकार पडलं. अलिबाबा चाळीस चोराच्या सरकारने आमचा कोट्यवधीचा निधी रोखला आहे. काही लोकं मला जाणीवपूर्वक बदनाम करतात.

मला भाजपमध्ये जायचं असलं तर तेव्हाच गेलो असतो. गुवाहाटीमध्ये आणि 50 खोके घेऊन आलो असतो. मी गुवाहाटी गेलो असतो तर या लोकांनी शेण घातलं असतं, असंही ते म्हणाले.

मला जळगावमधून फोन येत होते. गुवाहाटीला ये नाही तर नागपूरला ये. माझ्या लग्नात देवेंद्र फडणवीस आले. त्यांची माझी रास एक आहे. ते लग्नाला आले म्हणजे मी भाजपमध्ये गेलो असं होत नाही.