अमरावतीकरांसाठी (Amravati) आजही पहाट धक्कादायक होती. बडनेरा पोलीस (Badnera Police) ठाण्याअंतर्गत लोनी गावाजवळ हजरत दडबड शहा बाबांचा दर्गा आहे. या मुस्लिम दर्ग्यामध्ये एका सेवाधारासह एका युवकाची शस्त्राने हत्या (Murder) झाल्याची घटना उघडकीस आली. लालखडी येथील दर्ग्याचा सेवादार बअन्वर मुजावर (वय 50 वर्ष) व वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील तोफिक (वय 25 वर्षे ) अशी मृतांची नावे आहेत. दर्ग्यात दोन मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली.
रात्रीच्या सुमारास दोघांची हत्या झाल्याचा अंदाज बडनेरा पोलिसांनी व्यक्त केलाय. सकाळी शेतामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना दोनही मृतदेह दिसले. त्यानंतर या ठिकाणी पोलिसांना माहिती देण्यात आली. सुरुवातीला अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्या.
यावेळी श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त सिंग यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड घटनास्थळी पोहोचले.
बडनेरा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दर्ग्यांमधील लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. मात्र हत्या नेमकी काय कारणावरून झाली हे कळू शकले नाही. दोघांची हत्या झाल्याने अमरावती शहर शहर खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले.
लोनी गावाजवळ दर्गा आहे. या दर्ग्याजवळ सेवाधाऱ्याची हत्या झाली. तसेच दुसरा एक 25 वर्षीय युवकालाही ठार करण्यात आले. यामुळं हे मारेकरी कोण आहेत. याचा शोध घेण्याचे आव्हान बडनेरा पोलिसांसमोर आहे. या हत्येमागील कारण काय, हे तपासण्याचं काम अमरावती पोलीस करत आहेत. एकावेळी दोन मृतदेह सापडल्यानं तपासाचं मोठं आव्हान बडनेरा पोलिसांसमोर आहे.