अमरावती : आई आणि बाळाचं नात वेगळचं असतं. मग, ती आई पशू का असेना. कोंबडीच्या पिल्लाला हात लावायला गेलात तर कोंबडी अंगावर धावल्याशिवाय राहत नाही. कुत्र्यांच्या पिल्लांना हात लावालं तर कुत्री भुंकल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक घटना अमरावतीत घडली. बिबट्या (Leopard) मादीपासून पिल्ले दुरावली. पिल्लांजवळ त्यांची आई नव्हती. लहान पिल्लं असल्यानं ही दोन्ही पिल्ले बिबट्या मादीपासून वेगळी झाली असावीत, असं गावकऱ्यांना वाटलं. वनविभाग व पोलीस विभागाला कळविण्यात आलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी दुसऱ्या दिवशी पिल्लांना त्याचं जंगलात नेऊन सोडलं. तेव्हा त्या पिल्लांना शोधत तिथं बिबट्या मादी आली. अखेर बिबट्यांची दोन्ही पिल्ले आणि मादी बिबट्या यांची भेट झाली. ते जंगलात (Forest ) निघून गेले. वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांमुळं हे शक्य झालं. बिबट्यांची दोन्ही पिल्ले आपल्या आईच्या कुशीत विसावली.
वडाळी जंगलाच्या सीमेवर महादेव खोरी परिसर आहे. या परिसरात दोन बिबट्यांची पिल्ले 2 दिवसांपूर्वी नागरिकांना सापडली. माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल कुरळकर व वन विभागाच रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्यांची पिल्ले ताब्यात घेण्यात आली होती. ज्या ठिकाणाहून ही पिल्ले ताब्यात घेतली त्याचं ठिकाणी आज सकाळी बिबट्यांच्या दोन पिल्लांना सोडण्यात आले. काही वेळाने या पिल्लांची आई तेथे दाखल झाली. पिलांची आईसोबत भेट वनविभागाने घडवून आणली. उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला (भावसे), वनपाल अमोल गावणेर, पठाण व चमूने परिश्रम घेतले. अखेर पिल्लांना आईची भेट घालून दिली.
ज्या जागेवर बिबटे हरविले होते. त्याच जागेवर पुन्हा बिबट्या मादी आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिल्लांनाही त्याच भागात सोडले होते. अखेर आई असलेल्या बिबट्या मादीसोबत त्यांची भेट झाली. यामुळं आई व पिल्ले दोघेही खुश झाले. ही पिल्ले लहान असल्यानं त्यांना आईच्या मायेची गरज होती. ती गरज आता पूर्ण झाली. पिल्लांना आई मिळाली नसती तर ते दोघेही एकमेकांना शोधत बसले असते. पण, अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेतल्यामुळं आई आणि पिल्ले यांची भेट होई शकली.