एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह का धरला?, संदिपान भुमरेंनी स्पष्टचं सांगितलं

| Updated on: Sep 24, 2022 | 7:46 PM

भुमरे यांनी एक अनुभव सांगितला. एक प्रकल्प केला तर शेतकऱ्यांचा खूप फायदा होईल. अडीच वर्षे गेले. पण माझं पत्र उद्धव ठाकरे यांनी पाहिलं नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कोणत्याही जिल्ह्यात गेले नाही. पण त्यांना वेळ नव्हता.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह का धरला?, संदिपान भुमरेंनी स्पष्टचं सांगितलं
संदिपान भुमरेंनी स्पष्टचं सांगितलं
Image Credit source: t v 9
Follow us on

स्वप्निल उमप, टीव्ही ९, अमरावती : मंत्री संदिपान भुमरे आज अमरावतीत होते. ते म्हणाले, आम्ही सगळ्यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी तयार केलं. आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार यांना नाही. महाविकास आघाडी झाली तेव्हा आमचा विरोध होता. पण आमचं ऐकायला कोणीच नव्हतं. पक्षप्रमुख जर मुख्यमंत्री होत असतील तर आपण शांत राहील पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितलं.पण जेव्हा ते मुख्यमंत्री झाले ते कोणालाही भेटले नाही. जर मंत्र्यांना ते भेटत नसतील तर तुम्ही खूप लांबच राहिले, असं स्पष्टीकरण संदिपान भुमरे यांनी आज दिलं.

भेटायला गेलो, ते निघून गेले

भुमरे म्हणाले, उद्धव साहेब सांगत होते तुम्ही फक्त संघटना वाढवा. काम आणायचं नाही असे ते बोलत होते. आम्हाला फक्त ते टीव्हीवर दिसत होते. टीव्ही बंद झाली की मुख्यमंत्री आम्हाला दिसतच नव्हते. आम्हाला एकदा वर्षावर बैठकीसाठी बोलावलं. आम्हाला म्हणाले, कोणीतरी भेटायला आले मी जातो आणि ते उठून गेले. सांगा अशाने काय कामं होणार होती.

माझं पत्रसुद्धा पाहिलं नाही

भुमरे यांनी एक अनुभव सांगितला. एक प्रकल्प केला तर शेतकऱ्यांचा खूप फायदा होईल. अडीच वर्षे गेले. पण माझं पत्र उद्धव ठाकरे यांनी पाहिलं नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कोणत्याही जिल्ह्यात गेले नाही. पण त्यांना वेळ नव्हता. अशा मुख्यमंत्र्यांचा काय फायदा, अशी टीकाही त्यांनी केला.

आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही

उद्धव ठाकरे पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाळ्यात अडकले होते. देशाची पहिली घटना आहे की सत्तेतील मंत्री बाहेर पडले. मी कॅबिनेट मंत्री होतो. तरीही मी माझं पद धोक्यात टाकलं. कारण आम्हाला शिवसेना वाचवायची होती. बाळासाहेब यांचे विचार वाचवायचे होते. खरी गद्दारी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केली. आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार त्यांना नाही, असाही घणाघात भुमरे यांनी केला.

मातोश्रीवर खरे गोचीड

मातोश्रीवर गोचीड जमा झाले आहेत.कोणत्याच फाईलवर सही करत नव्हते. हे गोचीड त्यांना सांगत होते सही करू नका अडचणीत येणार. त्यामुळे कोणाचेच कामं झाले नाही. मराठा आरक्षणातील नोकऱ्या असो की ओबीसी आरक्षण असो ती सगळी कामं हाती घेतली आहेत. ज्यांनी कधी गाद्या उचलल्या नाही त्याला मंत्रिपद दिलं. पालकमंत्री पद दिलं मग गद्दार कोण, असा सवाल भुमरे यांनी केला.