अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना इशारा दिलाय. प्रहारच्या कार्यकर्त्यांची भावना ही आरपारच्या लढाईची असल्याचं बच्चू कडू म्हणाले. एकदाचं काय ती तोडफोड करून बाहेर निघू. अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांच्या भावना ही आरपारची आहे. एकदा काय ते तोडफोड करून बाहेर निघा, असे कार्यकर्ते म्हणतात. कारण रवी राणा अतिशय निच पद्धतीनं बोलला, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
बच्चू कडू म्हणाले, मला असं वाटते की, याबाबत त्यांनी व्यवस्थित अभिप्राय केला तर एक तारखेला त्याबाबत विचार करू. बदनामी झाली ती वापस द्या, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
मुंबईला मी संध्याकाळी पोहचणार आहे. दुपारी तीनचं फ्लाईट आहे. ते मिळालं तर ठीक नाहीतर रात्री आठ वाजताच्या फ्लाईटनं मुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला मुंबईला जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री कसा तोडगा काढतात ते मला माहीत नाही. दोघांनाही एकत्र बोलावणार की, वेगवेगळं हे मुख्यमंत्री महोदय ठरविणार, असं ते म्हणाले.
कार्यकर्त्यांच्या भावना ही तोडफोडीची आहे. खूप निच पद्धतीनं बोलला आहे तो. यात व्यवस्थित अभिप्राय मिळाला पाहिजे. अन्यथा एक तारखेला आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. त्यामुळं ते गेल्या पत्रकार परिषदेत ट्रेलर असल्याचं म्हणाले होते. पिक्चर एक तारखेला दाखविणार, असं त्यांचं म्हणणं होते.
आजच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनंतर योग्य तो निर्णय बच्चू कडू घेणार आहेत. त्यामुळं आजची ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. अन्यथा या दोन राजकीय नेत्यांचं भांडण कोणत्या स्तराला जाईल काही सांगता येत नाही.