अमरावती : अमरावतीच्या खासदार व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचं मोठं राजकीय वैर आहेत. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मतदार संघातील शिरजगाव मोझरी येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजने (Pradhan Mantri Gramsadak Yojana) अंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजनात खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Guardian Minister Yashomati Thakur) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद डोक्याच्या वर गेलं आहे. त्यामुळं माझा काळजी म्हणून व मोठी बहीण म्हणजे एक सल्ला आहे. त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन मनोरुग्णांचे उपचार करून घ्यावे. असा टोला नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना लगावला. कारण आणखी अडीच वर्षे बाकी आहेत. त्यामुळं लगेच आपल्या डोक्याचा उपचार करून घ्यावा, असेही त्यांनी म्हटलं. तर चुकीच्या पद्धतीने मंत्रीपद त्यांच्याकडे गेलं. आता त्यांना सहन होत नाही, असा टोला नवनीत राणा यांनी यावेळी लगावला.
सामान्य लोकांसोबत चिटणीभाकर खाल्ली तरी ते मदत करतात. मी सामान्य लोकांसोबत असल्यानं त्यांनी मला खासदार बनविले आहे. ज्याचा लेकरु त्यांनीच बारसा करावं, असं वरिष्ठ संजू देशमुख म्हणतात. ते खूप सिनीअर आहेत. काही गोष्टी डोक्याच्या वर जातात. ज्यांनी भूमिपूजन केलं त्यांना ते पद डायजेस्ट होत नाही. पालकमंत्र्यांचं पद डोक्याच्या वर चाललंय. मोठी बहीण म्हणून एक सजेशन आहे.
दहा-बारा वर्षे माझ्यापेक्षा मोठ्या असतील. रवी यांना यांच्यापेक्षाही त्या मोठ्या आहेत. मोठ्यांचा आम्ही आदर करतो. मोठ्यांचा आम्ही कधी अपमान करत नाही. त्यांची काळजी घ्यावी, या उद्देशानं मी त्यांना सल्ला देते. सायको ट्रीटमेंट डॉक्टर असतात त्यांच्याकडं जाऊन ट्रीटमेंट करावी. येणाऱ्या काळात त्यांना याचा फायदा होणार आहे. एखाद्या व्यक्तीकडं चुकीनं एखादं पद येते. ते डायजेस्ट करता आलं नाही. त्यांना ते पचत नाहीस, असंही खासदार राणा म्हणाल्या.