नाशिक : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर जवळपास 14 दिवस गायब असलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी माध्यमांसमोर आले. पोहरादेवी गडावर जात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बंजारा समाजातील नागरिक आणि संजय राठोड यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणावर आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीने गंभीर आरोप केला आहे. समाजाची ढाल पुढे करुन जातपंचायत सक्रिय झाल्याचा आरोप अंनिसने म्हटलंय.(ANIS alleges that caste panchayat became active in Sanjay Rathod case)
जात पंचायत हस्तक्षेक करुन पूजा चव्हाणच्या कुटुंबावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. नायकांचा बैठका म्हणजे जात पंचायतीच्याच बैठका आहेत. राज्यात जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात असूनही मंत्र्यांकडूनच कायदा आणि न्याय व्यवस्थेला आव्हान दिलं जात असल्याचा आरोपही अंनिसने केलाय. मंत्र्यांनी पोहरादेवी गडावर जात भूमिका मांडण्याची गरज काय?, धार्मिक संत-महंतांच्या उपस्थितीत भूमिका मांडण्याची गरज काय? असा सवाल अंनिसने उपस्थित केला आहे. समाजाची मतं आपल्याकडे राहावी यासाठी राठोड पोहरादेवीला गेले. त्याऐवजी राठोड यांनी मुख्यमंत्र्यांपुढे आपले स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं, असंही अंनिसने म्हटलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
जवळपास 15 दिवसानंतर संजय राठोड आज माध्यमांसमोर आले. पोहोरादेवीगडावर सर्व समाध्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे एवढीच चालली. पण पत्रकार परिषदेची सुरुवातच त्यांनी पुजा चव्हाणचं नाव घेऊन केली. ते म्हणाले, पुजा चव्हाण ही आमच्या गोर बंजारा समाजातील तरुणी होती आणि तिचा पुण्यात अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचं आमच्या गोर बंजारा समाजाला अत्यंत दु;ख झालं आहे. चव्हाण कुटुंबाच्या दु:खात मी आणि आमचा सर्व समाज सहभागी आहे. यानंतर मात्र त्यांनी पुजाचं पुढे कुठेही नाव घेतलं नाही.
संबंधित बातम्या :
‘हा तर बेशरमपणाचा कळस, संजय राठोड यांना अटक करा’, राठोडांच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजप संतप्त
नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
ANIS alleges that caste panchayat became active in Sanjay Rathod case