तळपायाची आग मस्तकात गेली, हे चाललंय काय?; अजितदादांचं नाव घेत अंजली दमानियांचा थेट सवाल

| Updated on: Dec 07, 2024 | 2:57 PM

Anjali Damania on Ajit Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वेळाआधी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं नाव घेत काही सवाल उपस्थित केले आहेत. तसंच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही दमानिया यांनी भाष्य केलं आहे. वाचा...

तळपायाची आग मस्तकात गेली, हे चाललंय काय?; अजितदादांचं नाव घेत अंजली दमानियांचा थेट सवाल
anjali damania ajit pawar
Follow us on

विधानसभा निवडणुकीतील यश आणि सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना काही तासातच आयकर विभागाकडून दिलासा मिळाला आहे. 6 डिसेंबर 2021 ला आयकर विभागाने अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता मुक्त केली आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. आज मी तुमच्या पुढे आली आहे अजित पवार यांना एक हजार कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली आहे. अशी जी बातमी आज माध्यमांपुढे आली खरंच सांगते, तळपायाची आग मस्तकात गेली. हे चाललंय काय?, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.

सुनेत्रा पवार- अजितदादांचं नाव घेत दमानियांचे सवाल

तुम्ही आधी त्यांच्या मागे ये डब्ल्यू लावणार त्यांच्या मागे सगळ्या यंत्राला लावणार इन्कम टॅक्सच्या रेट्स करणार. 2021 मध्ये जन्मेश्वर वर साखर कारखान्यावर रेड झाली होती आणि त्याच्यात फायर पॉवर नावाच्या कंपनीस जेवढ्या आहेत. ज्या सगळ्यांना माहिती आहेत. कंपनी या सुनेत्रा पवार अजित पवार यांनी सुरू केलेल्या कंपनीज आहेत. त्यातनं सुनेत्रा पवार आणि अजित पवार बाहेर पडले. पण आज तगायत हे त्यांच्या जवळचे नातेवेग जे आहेत तेच त्या कंपन्या चालवतात, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्रात शाळा नाही कॉलेज नाही हॉस्पिटल नाही रुग्णांना न्यायला ॲम्बुलन्स नाहीये. मुलांना शाळेत जायला रस्ते देखील धड नाहीयेत. काही मुलं पोहोच जातात काहींना तिकडे जायला ब्रिज देखील नाहीये. अशा परिस्थितीत ज्या महाराष्ट्रावर इतकं अफाट कर्ज झालंय. त्या महाराष्ट्रातले सगळे नेते अक्षरशः मजा करतात कुठेतरी हे सगळं थांबायला हवं. कालच भालचंद्र नेमाडेपण म्हणाले की हा जो अफाट उधळपट्टीची चालली आहे. ती कुठेतरी थांबायला हवे आणि या सगळ्या राजकीय पक्षांना आता शुद्धीवर आणायला हवं, असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

एक महत्त्वाचा मुद्दा सुनेत्रा पवार आज चार कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत. पण त्यांनी 24 कंपन्यांमध्ये पूर्ण यादी की त्यांच्या असलेल्या कंपन्यांची आहे ही पूर्ण यादी २४ कंपन्यांमध्ये त्या डायरेक्टर होत्या. ज्याच्यात फायर पॉवर आहे एसएपी आहे. कुणाला वाटेल साफ कन्सल्टंट सामाजिक जर कंपनी असेल तर ही सुनेत्रा, अजित पवार म्हणजे सात फायर पॉवर नावाच्या ज्या कंपन्या आहेत त्या त्यांनी आणि अजित पवार यांनी स्थापन केलेल्या कंपनीचे त्याचे डाऊनलोड केलेले आहे. ते आज सगळ्या कंपन्या फक्त आणि फक्त हे सगळे उद्योग करण्यासाठी आहेत, असं दमानिया म्हणाल्या.

आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुन्हा मी तेच म्हणते की आतल्या दोन कंपन्या स्पाकलींग सॉइल आणि बीएसएफ केमिकल याचा अर्थ पैसा जो फिरवला गेला. एक नवीन कंपनीमध्ये आणि त्याच्या त्या दिवशी बी एफ एस केमिकलमधलं सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिला तर ती तारीख महत्त्वाची आहे 25 ऑक्टोबर 2010 ज्या दिवशी ही हे बिडींग करून जन्मेश्वर विकत घेतलं गेलंय त्याच्या त्या दिवशी सुनेत्रा पवार हा जी कंपनी सोडतात हा केवळ योगायोग आहे का नाही ते आता महाराष्ट्रने ठरवावे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.