नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलेल्या भाऊसाहेब चौधरी यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र सचिवपदाची जबाबदारीचे नियुक्ती पत्र भाऊसाहेब चौधरी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के देखील उपस्थित होते याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून याबाबत सचिवपदी नियुक्ती झाल्याची माहिती दिली आहे. भावी सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. संजय राऊत यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असणारे भाऊसाहेब चौधरी यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याने चौधरी यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा नाशिकसह राज्यातील राजकीय वर्तुळात होऊ लागली होती.
मागील आठवड्यात भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्विट स्वतः संजय राऊत यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे जामीनदार आहेत, त्यातच संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भाऊसाहेब चौधरी यांचं मोठं राजकीय वजन होतं.
भाऊसाहेब चौधरी यांची #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/2cd9twNF3L
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 24, 2022
संजय राऊत यांचा एकप्रकारे उजवा हात म्हणून भाऊसाहेब चौधरी यांनी आपली ओळख निर्माण केली होती, असे असतांनाच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील 12 नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले होते.
त्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच शिंदे गटात नाशिक शहराचे संपर्कप्रमुख असलेले भाऊसाहेब चौधरी यांनी प्रवेश केल्यानं त्यांच्या प्रवेशाची चर्चा होऊ लागली होती.