अहमदनगर : साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे ( Kanhuraj Bagate) यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा मोठा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलाय. त्यांच्या नियुक्तीला विरोध करत शिर्डी येथील उत्तम शेळके यांनी याचिका दाखल केली होती. (appointment of Kanhuraj Bagate as chief executive officer of Saibaba Sansthan is illegal)
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीच्या विरोधात शिर्डी येथील उत्तम शेळके यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला. न्यायालयाने कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचे सागंत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. बगाटे हे आयएएस ऑफिसर नसूनसुद्धा राज्य सरकारने त्यांनी शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती दिली होती.
राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता शिर्डी ग्रामपंचायतीने तीन आठवड्यांपूर्वी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आता शिर्डीत कोणताही नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्याला 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांकडून पाच हजारांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती शिर्डी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली.
दरम्यान, कान्हूराज बगाटे यांनी निवड ही नियमबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यामुळे बगाटे अडचणीत सापडले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बगाटे यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यानंतर शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नेमणूक होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दररोज 1 लाख लोकांना लस, 45 लाखाचं टार्गेट, मुंबई आयुक्तांचा मास्टर प्लॅनhttps://t.co/Zav1gHupZi#CoronaVaccine #Corona #MumbaiCoronaUpdate #IqbalSinghChahal #Mumbai #MubaiVaccination #MumbaiDharawiPattern @IqbalSinghChah2 @mybmc @KishoriPednekar
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 19, 2021
इतर बातम्या :
दररोज 1 लाख लोकांना लस, 45 लाखाचं टार्गेट, मुंबई आयुक्तांचा मास्टर प्लॅन
(appointment of Kanhuraj Bagate as chief executive officer of Saibaba Sansthan is illegal)