मुंबई : ओबीसी समाजाच्या विकासासाठी निधी मिळत नसल्यामुळे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याच कारणामुळे बुधवारी (13 ऑक्टोबर) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते हजर राहणार नाहीत. यापूर्वीदेखील ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनुपस्थित होते. विशेष म्हणजे बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असताना दुसरीकडे विजय वडेट्टीवार नागपूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. वडेट्टीवार यांच्या या भूमिकेमुळे खरंच ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी निधी दिला जात नाहीये का ? असा सवाल आता विचारण्यात येतोय.
वडेट्टीवार ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आक्रमक भूमिका मांडताना दिसतात. ओबीसी आरक्षणापासून विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच सर्वांगीण विकास या मुद्द्यांवरही वडेट्टीवार भूमिका घेताना दिसतात. त्यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाच्या अनेक सभा, परिषदा तसैच महत्त्वाच्या बैठका पार पडलेल्या आहेत. मात्र सध्या त्यांच्या कथित नाराजीमुळे एकच चर्चा रंगली आहे. ते बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्याऐवजी ते नागपूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. ओबीसी समाजाला निधी मिळत नसल्यामुळे वडेट्टीवार नाराज आहेत. यापूर्वीच्या बैठकीलासुद्धा ते उपस्थित नव्हते. या अनुपस्थितीमागे ओबीसी निधीचा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे.
ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून वडेट्टीवार यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळात असूनदेखील त्यांच्या खात्याला सुविधा तसेच निधीचा अभाव असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 72 वसतीगृहांची मागणी केली होती. मात्र, या मागणीचे पुढे काही झालेले नाही. तसेच त्यांच्या खात्याला स्वतंत्र कार्यालय नाही. तसेच स्वतंत्र यंत्रणाही नाही. या सर्व गोष्टींमुळे विजय वडेट्टीवार नाराज असल्याचे म्हटले जात आहे. टीव्ही 9 मराठीच्या खात्रीलायक सूत्रांनी तशी माहिती दिली आहे.
इतर बातम्या :
आघाडी सरकारला येणाऱ्या काळात सळो की पळो करुन सोडू, आशिष शेलारांचा इशारा
चाहत्यांची प्रतीक्षा संपली, सलमान खानच्या अंतिम चित्रपटाची रिलीज डेट आऊटhttps://t.co/OYWRvPEzd6#SalmanKhan |#Antim |#ReleaseDate |#Announced
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2021
(appropriate funds not given for obc development minister is unhappy on obc student hostel and fund)