नाशिक : मागील आठवड्यापासून राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर आधारित हर हर महादेव या चित्रपटावरुन राजकीय शो रंगला आहे. त्यामध्ये सुरुवातील संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन वेशभूषा आणि इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याचा आक्षेप घेतला होता. त्यानंतर या प्रकरणात संभाजी ब्रिगेड या संघटनेने आक्षेप घेतला, त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्षाने देखील आक्षेप घेत ठिकठिकाणी शो बंद पाडले होते. त्यानंतर नाशिकमध्ये देखील मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने हर हर महादेव चित्रपटाचा राजकीय शो मंगळवारी बघायला मिळाला होता. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष, स्वराज्य संघटना यांनी चित्रपट दाखवू नये म्हणून सिनेमा गृहाच्या प्रशासनाला निवेदन देत मागणी केली होती. त्यानंतर मनसेने तात्काळ सिनेमागृहात धाव घेत हर हर महादेव चित्रपट सुरू करावा अशी मागणी केली होती, त्या मागणीला यश आले असून आज नाशिकमध्ये दोन शो पार पडणार आहे.
संपूर्ण राज्यात हर हर महादेव या चित्रपटावरुन राजकारण तापलं आहे. त्यातच ठाण्यानंतर नाशिकमध्ये देखील शो बंद करण्यात आले होते.
यावरून मंगळवारी नाशिकच्या सिटी सेंटरर मॉल येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि मनसेमध्ये चांगलाच राडा झाला होता. यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र्यावर आधारित हर हर महादेव हा चित्रपट प्रसारित झाला असून त्याला ठिकठिकाणी विरोध केला जात आहे.
यामध्ये मनसेच्या मागणीवरून पुन्हा एकदा नाशिकमध्ये शो सुरू करण्यात आला आहे. खरंतर मनसेच्या मागणीवर हा शो सुरू केला जाणार असला तरी शो सुरू होण्याच्या वेळी वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्वराज्य संघटनेने देखील नाशिकमधील सिनेमागृह येथे निवेदन देत हर हर महादेव चित्रपट दाखवू नका म्हणून मागणी केली आहे.
यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतली असून हर हर महादेव चित्रपटात राज ठाकरे यांनी व्हॉईस दिला असल्याने मनसेने विरोध करू नये असं आवाहन देखील राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे.