नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत नियमित घेत असलेल्या कोरोना नियंत्रण आढावा बैठकांमधून अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. आजही अशीच बैठक झाली बैठकीत नाईक यांनी प्रामुख्याने लसीकरण, शिक्षण, आरोग्य, पावसाळापूर्व कामे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक आदी उपस्थित होते. (Arrange tabs and desktops for Studend in covid-19 situation; MLA Ganesh Naik advice to the Navi Mumbai Commissioner)
कोरोना महामारीमुळे चालू शैक्षणिक वर्षात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. खासगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडले. मात्र नवीन शैक्षणिक वर्षात हे चित्र बदलले पाहिजे. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आतापासूनच अभ्यासक्रमाचे नियोजन करावे, असा सल्ला आमदार नाईक यांनी दिला. पालिका अर्थसंकल्पातील सर्वाधिक निधी हा शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करावा. गरज पडली तर पालिकेने विद्यार्थ्यांना टॅब (टॅबलेट) द्यावेत. डेस्कटापॅकची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
माजी आमदार संदीप नाईक यांनी शिक्षकांना शिक्षकेतर कामांत गुंतवूण ठेवल्याने शिक्षणाचा दर्जा ढासळतो, असे मत मांडले. पालिकेने शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शाळांचे नियोजन करावे, असा सल्ला दिला. त्यावर आयुक्त बांगर यांनी शिक्षण तज्ज्ञांना विचारून ऑनलाईन शिक्षण, अभ्यास साहित्य इत्यादींचे नियोजन मे महिन्यापूर्वीच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कोरोनाला पळवायचे असेल तर 100 टक्के नागरिकांचे लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे मत आमदार नाईक यांनी यावेळी मांडले. नवी मुंबईत पालिका आणि खासगी रूग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. सोसायट्यांनाही लसीकरणासाठी परवानगी देण्यात येत आहे. सोसायट्यांच्या अर्जांवर कार्यवाही करून लवकरात लवकर त्यांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी.
नवी मुंबई सुरु असलेल्या लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. पालिकेने लवकरात लवकर लस खरेदी करावी. त्यासाठी लस उत्पादक कंपन्यांसोबत पत्रव्यवहार करावा आणि लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी. जेव्हा केंद्र सरकार पालिकांना लस खरेदीसाठी परवानगी देईल, त्यावेळेस जागरूक राहून लस खरेदीची प्रक्रीया तातडीने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली असता आयुक्त अभिजित बांगर यांनी ती मान्य केली.
इतर बातम्या
सिडको सदनिका सोडतधारकांचा दुरुस्ती देखभाल खर्च माफ करा, सोशल मीडियावर विशेष मोहीम
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाना पटोलेंची आग्रही मागणी
(Arrange tabs and desktops for Studend in covid-19 situation; MLA Ganesh Naik advice to the Navi Mumbai Commissioner)