मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : मालेगाव शहरातील (Malegaon City) रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल ( MLA Maulana Mufti Ismail ) यांनी मनपा प्रशासन यांच्याकडे अनेकदा निवेदन देत रस्ते दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, तरीही रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात नसल्याने आमदार मौलांना मुफ्ती इस्माईल यांनी आंदोलन सुरू केले आहे. जुना आग्रा रोडवर एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी रास्ता रोको करत आक्रमक भूमिका घेतली होती. याचदरम्यान मनपा कार्यालयात जात असतांना मालेगाव महानगर पालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांचे शासकीय वाहन अडवत जाब विचारण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला. आयुक्तांना अडविण्यासाठी आंदोलकांनी थेट शासकीय वाहनांच्या समोर झोपून घेतले होते. एकूणच मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिक आक्रमक झालेले असतांना आयुक्त गोसावी हे गाडीच्या खाली उतरले, आंदोलकांनी थेट आयुक्तांच्या अंगावर गटारीचे पाणी फेकले, इतकेच काय जवळच असलेल्या चहाच्या टपरीवरुन चहा देखील फेकला आहे.
आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल हे मालेगाव मध्यचे आमदार आहे, त्यांच्या मतदार संघातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्याने त्यांनी आंदोलन पुकारले होते.
जुना आग्रा रोड येथे रास्ता रोको करत चक्का जाम आंदोलन करत पालिका आयुक्तांचे वाहन देखील अडवले होते.
त्याच दरम्यान संतप्त आंदोलकांनी रस्त्याच्या मुद्द्यावरून मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांना घेरले होते, त्याच दरम्यान आयुक्त गोसावी यांच्यावर आंदोलक आक्रमक झाले होते.
त्याचेवेळी आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या अंगावर गटारीचे पाणी आणि गरम चहा फेकला आहे.
रस्त्यावरील खड्डे, गटारीचा मुद्दाने मालेगाव येथील नागरिक त्रस्त असून आमदार मुफ्ती यांनी पुकारलेले आंदोलन तापले असून जोपर्यन्त रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यावर ठाम असल्याची भूमिका घेण्यात आली आहे.